खरिपासाठी बियाणे, खते तत्काळ पुरवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2019 09:21 PM2019-05-20T21:21:39+5:302019-05-20T21:22:12+5:30

जिल्ह्याची अर्थव्यवस्था कृषीवर आधारीत आहे. निसर्ग, पाणी आदी गोष्टी आपल्या हाती नसल्या तरी योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यावर कृषी विभागाचा भर असला पाहिजे. खरीप हंगामाला सुरुवात होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना वेळेवर दर्जेदार बियाणे आणि खते उपलब्ध करून देण्याचे नियोजन कृषी विभागाने तत्काळ करावे, अशा सूचना पालकमंत्री मदन येरावार यांनी दिल्या.

Provide seeds for Kharhipa, fertilizers immediately | खरिपासाठी बियाणे, खते तत्काळ पुरवा

खरिपासाठी बियाणे, खते तत्काळ पुरवा

Next
ठळक मुद्देपालकमंत्र्यांच्या सूचना : नऊ लाख १० हजार हेक्टरवर नियोजन

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : जिल्ह्याची अर्थव्यवस्था कृषीवर आधारीत आहे. निसर्ग, पाणी आदी गोष्टी आपल्या हाती नसल्या तरी योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यावर कृषी विभागाचा भर असला पाहिजे. खरीप हंगामाला सुरुवात होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना वेळेवर दर्जेदार बियाणे आणि खते उपलब्ध करून देण्याचे नियोजन कृषी विभागाने तत्काळ करावे, अशा सूचना पालकमंत्री मदन येरावार यांनी दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयात कृषी विभागातर्फे आयोजित जिल्हा खरीप हंगामपूर्व आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी आमदार मनोहरराव नाईक, आमदार ख्वाजा बेग, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जलज शर्मा, विभागीय कृषी सहसंचालक सुभाष नागरे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नवनाथ कोळपकर आदी उपस्थित होते.
कृषी विभागाच्या योजना केवळ कागदावर ठेवू नका. शेतकऱ्यांना हंगामात बियाणे व खतांची कमतरता जाणवणार नाही, याची काळजी घ्या. माती परिक्षणासंदर्भात जमिनीचा पोत पाहून शेतकºयांना मार्गदर्शन करा. जलयुक्त शिवार, धडक सिंचन, शेततळ्यांमुळे शेतकºयांना लाभ झाला आहे. या गोष्टींमध्ये सातत्य ठेवण्यासाठी कृषी विभागाने अधिक जोमाने काम करावे, असे ना. येरावार यांनी सांगितले. पीक विमा योजनेत सर्व शेतकºयांना सहभागी करण्याचे प्रयत्न करा, असेही ते म्हणाले.
जिल्ह्यात २०१९-२० मध्ये नऊ लाख १० हजार ५०५ हेक्टरवर खरीप हंगामाचे नियोजन करण्यात आले आहे. यात सोयाबीन दोन लाख ७७ हजार ८४२ हेक्टरवर, कापूस चार लाख ५८ हजार ८५६ हेक्टर, तूर एक लाख ३१ हजार १९१ हेक्टर, ज्वारी १५ हजार ८७५ हेक्टर, उडीद ७०३४ हेक्टर, मूग ८६६८ हेक्टर, मका २२० हेक्टर आणि इतर पिके १० हजार ८९१ हेक्टर यांचा समावेश आहे. जिल्ह्यात सोयाबीनची मागणी एक लाख ५६ हजार २८६ क्विंटल आहे. आतापर्यंत ७५ हजार क्विंटल उपलब्ध झाले आहे. कपाशीच्या २५ लाख ४४ हजार १११ पॅकेटची मागणी नोंदविण्यात आली आहे. जिल्ह्यासाठी एकूण खतांची मागणी एक लाख ९८ हजार ७०७ मेट्रीक टन आहे. यापैकी आजघडीला एक लाख ३३ हजार ८६४ मेट्रीक टन खतांची उपलब्धता झाली आहे. यात युरिया, एमओपी, एसएसपी, कॉम्प्लेक्स, एनपीकेएस या खतांचा समावेश आहे.
तक्रार नियंत्रण कक्ष
जिल्हा परिषद आणि पंचायत समिती स्तरावर तक्रार नियंत्रण कक्ष उघडण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते कृषी विभागाच्या योजनांवर आधारीत घडीपत्रिकेचे प्रकाशन करण्यात आले. प्रवीण जाधव आणि काशीराम राठोड यांना जमिनीची आरोग्यपत्रिका पालकमंत्र्यांच्या हस्ते देण्यात आली.

Web Title: Provide seeds for Kharhipa, fertilizers immediately

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.