पुसदच्या कुस्तीत हिंगोलीचा गजानन भोयर अजिंक्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2019 09:22 PM2019-01-03T21:22:23+5:302019-01-03T21:23:29+5:30

दिवंगत वसंतराव नाईक यांच्या प्रेरणेतून शहरात दरवर्षी १ जानेवारीला कुस्त्यांची दंगल भरविली जाते. यावर्षी अंतिम लढतीत हिंगोलीचा पहेलवान गजानन भोयर याने सुनील शेवतकर याला लोळवून अजिंक्यपद प्राप्त करून चांदीची गदा पटकाविली.

Pujya's wrestling Hingoli's Gajanan Bhoyar Ajinkya | पुसदच्या कुस्तीत हिंगोलीचा गजानन भोयर अजिंक्य

पुसदच्या कुस्तीत हिंगोलीचा गजानन भोयर अजिंक्य

Next
ठळक मुद्देदंगल रंगली : देशभरातील शेकडो मल्लांचा सहभाग

लोकमत न्यूज नेटवर्क
पुसद : दिवंगत वसंतराव नाईक यांच्या प्रेरणेतून शहरात दरवर्षी १ जानेवारीला कुस्त्यांची दंगल भरविली जाते. यावर्षी अंतिम लढतीत हिंगोलीचा पहेलवान गजानन भोयर याने सुनील शेवतकर याला लोळवून अजिंक्यपद प्राप्त करून चांदीची गदा पटकाविली.
येथील हनुमान व्यायाम प्रसारक मंडळातर्फेकुस्त्यांची दंगल भरविण्यात आली. दंगलीचा शुभारंभ पुसद अर्बन बँकेचे अध्यक्ष शरद मैंद यांनी हनुमानाची पूजा व श्रीफळ अर्पण करून केला. यावेळी नगरसेवक निशांत बयास, इंद्रनील नाईक, परमेश्वर जयस्वाल, वैभव फुके, डॉ.शैलेंद्र नवथळे, यशवंत चौधरी, अमोल व्हडगिरे, शेख कयुम आदी उपस्थित होते.
विदर्भ केसरी मंगेश करण, उपविदर्भ केसरी गणेश भिसे, किशोर पाणपट्टे, विशाल कांबळे, संजय दिंडे, राजाराम काळे, सतीश कानडे, खेमानंद मेहता, अशोक बनचरे, विष्णू गुद्धटवार, अभिमन्यू शिंदे, दत्ता बेरगड यांच्या उपस्थितीत प्रारंभ झाला. धनाजी मदने, अमोल साखरे यांनी समालोचन केले. अंतिम लढतीत गजानन भोयरने सुनीलला पराभूत करून चांदीची गदा पटकाविली. शरद मैंद, मनीष शहा, इंद्रनील नाईक, सुधीर राठोड, सकीब शहा, राजू साळुंके, अमन खान, अमित बोरले, भीमराव कोळपे, संजय दिंडे, बिपीन चिदरवार, निशांत बयास, विलास काळे, विकास जामकर, सज्जन आडे, विनोद राठोड, दिनेश ठाकूर, समीर गवळी, बबन पांढरे, गजानन रेवणवार, आनंद मस्के आदींनी विजेत्यास चांदीची गदा, सन्मानपत्र, विजयी ट्रॉफी देऊन गौरविले.
महिमा, तेजस्वीनीने वेधले लक्ष
पुरुषांचा मर्दानी खेळ असलेल्या कुस्तीत आता महिलाही मागे नाही. त्याची प्रचिती तालुक्यातील फुलवाडीची महिमा राठोड व अमरावतीची तेजस्वीनी यांनी दिली. महिमा राठोड व परवेझ खान यांच्या कुस्तीचा जोड शरद मैंद, आमदार डॉ.वजाहत मिर्झा, अ‍ॅड.सचिन नाईक यांनी लावला. त्यात महिमाने परवेझला लाल मातीत लोळवीत बाजी मारली. शरद मैंद व आमदार डॉ.वजाहत मिर्झा यांनी तिला १५ हजारांचे व्यक्तीगत बक्षीस दिले.

Web Title: Pujya's wrestling Hingoli's Gajanan Bhoyar Ajinkya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.