पुसद दरोड्यातील पंडित गजाआड
By admin | Published: May 26, 2017 01:08 AM2017-05-26T01:08:02+5:302017-05-26T01:08:02+5:30
येथील शासकीय कंत्राटदाराच्या घरी बंदुकीच्या धाकावर दरोडा प्रकरणातील पसार आरोपी पंडित मिश्रा याला पुसद पोलिसांनी
दोन वर्षांपासून गुंगारा : बंदुकीच्या धाकावर ऐवज लुटल्याचे प्रकरण
लोकमत न्यूज नेटवर्क
पुसद : येथील शासकीय कंत्राटदाराच्या घरी बंदुकीच्या धाकावर दरोडा प्रकरणातील पसार आरोपी पंडित मिश्रा याला पुसद पोलिसांनी मोठ्या शिताफीने दिग्रस-दारव्हा मार्गावर बुधवारी रात्री अटक केली. तो पोलिसांना गुंगारा देत दोन वर्षांपासून पसार होता.
पुसद येथील रामनगरातील शासकीय कंत्राटदार जयंत चिद्दरवार यांच्या बंगल्यावर दरोडा पडला होता. पाच ते सहा दरोडेखोरांनी बंदुक आणि चाकूचा धाक दाखवून दहा लाखांचा ऐवज लंपास केला होता. तसेच चिद्दरवार कुटुंबातील सदस्यांना मारहाण करण्यात आली होती. या दरोड्याच्या तपासात पोलिसांना पंडित मिश्रा हा मास्टर मार्इंड असल्याचे पुढे आले. पंडितच्या गँगने यापूर्वीच यवतमाळ आणि दारव्हा येथे दरोडा टाकला होता. परंतु तो दोन वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देत पसार होता. मध्यंतरीच्या काळात न्यायालयातून जामीनही मिळाला होता. त्याचा जामीन रद्द व्हावा, अशी मागणी पोलिसांनी न्यायालयात केली होती. अखेर दारव्हा न्यायालयाने पंडित मिश्राची जामीन रद्द केली. तो पसार होऊ नये म्हणून उपविभागीय पोलीस अधिकारी अजयकुमार बन्सल यांच्या मार्गदर्शनाखाली शहर ठाणेदार वाघु खिल्लारे यांनी दारव्हा व दिग्रस पोलिसांना माहिती दिली. त्यानुसार पोलिसांनी नाकाबंदी केली असता दारव्हा येथून दिग्रसकडे येताना दुचाकीस्वार पंडित मिश्राला अटक केली. त्याच्याकडून किती मुद्देमाल जप्त केला जातो, याकडे लक्ष आहे.