गंभीर गुन्ह्यातील शिक्षेचे प्रमाण तिपटीने वाढले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2020 05:00 AM2020-07-10T05:00:00+5:302020-07-10T05:00:35+5:30
गेल्या तीन महिन्यांपासून जिल्ह्यात लॉकडाऊन आहे. या काळात संचारबंदीचे उल्लंघन करणाºया व्यक्तींविरुद्ध कलम १८८ अन्वये गुन्हे नोंदविले गेले. ही प्रकरणे प्रलंबित न ठेवता लगेच न्यायालयात सादर केली गेली. न्यायालयांनीही तातडीने हे खटले निकाली काढले. त्यात तब्बल ३७४ जणांना शिक्षा झाली. दंड म्हणून त्यांच्याकडून चार लाख ९५ हजार ४०० रुपयांची रक्कम वसूल केली गेली.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : काही वर्षांपूर्वी अवघा १५ टक्के असलेला गंभीर गुन्ह्यांच्या न्यायालयीन खटल्यातील शिक्षेचा दर आता तिपटीने वाढून ५२.८५ टक्क्यावर पोहोचला आहे. पोलिसांचा काटेकोर तपास व पंच-साक्षीदारांच्या पाठपुराव्याचे हे फलित मानले जाते.
एकेकाळी जिल्ह्यातील गंभीर गुन्ह्यात शिक्षेचे प्रमाण अवघे ५ टक्के होते. नंतर एसडीपीओ स्तरावर विधी अधिकारी व प्रत्येक न्यायालयामध्ये पैरवी अधिकारी नियुक्त केले गेले. त्यामुळे २०१५ मध्ये भादंविच्या गुन्ह्यातील शिक्षेचे प्रमाण १५.४५ टक्क्यांवर पोहोचले. त्यात प्रत्येक वर्षी वाढ होत गेली. २०२० मध्ये ३० जून अखेर हे प्रमाण ५२.८५ टक्के झाले. १ जून २०१७ ला यवतमाळ येथील जिल्हा पोलीस अधीक्षक म्हणून रुजू झालेल्या एम. राज कुमार यांनी न्यायालयीन खटल्यांमध्ये शिक्षेचे प्रमाण वाढविण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले. त्यासाठी प्रत्येक आठवड्याला आढावा घेतला जातो, या आठवड्यात कोणती केस बोर्डावर लागणार, त्यातील गुन्हा साबित होण्याच्या दृष्टीने महत्वाचे पैलू काय, पंच-साक्षीदार कोण याच्यावर फोकस निर्माण केला जातो. महत्वपूर्ण पंच-साक्षीदाराला विश्वासात घेऊन न्यायालयातील उलट तपासणीच्या दृष्टीने भक्कम तयारी करून घेतली जाते. दाखल होणाऱ्या नव्या गुन्ह्यांमध्ये पंचनामा करताना काही त्रुटी राहणार नाही, याची खबरदारी घेतली जाते. स्थळ पंचनाम्याच्यावेळी तेथे सापडणाºया वस्तू रेकॉर्डवर घेऊन त्या माध्यमातून गुन्ह्याचा हेतू व आरोपीपर्यंत कनेक्टीव्हीटी निर्माण केली जाते. या साखळीतूनच गुन्हे सिद्ध होणे व त्यात न्यायालयाकडून शिक्षा ठोठावली जाण्याचे प्रमाण वाढले आहे. बोर्डावर आलेल्या जुन्या खटल्यांमध्ये सर्वाधिक फोकस पंच-साक्षीदारावर निर्माण केला जातो. पोलिसांच्या या सर्व परिश्रमांमुळेच २०१७ ला १९.९६ टक्के असलेले गंभीर गुन्ह्यातील शिक्षेचे प्रमाण आता तब्बल ५२.८५ टक्क्यावर पोहोचले आहे. गेल्या तीन वर्षात दाखल झालेल्या गुन्ह्यांमध्ये भक्कम तपास करून दोषारोपपत्रे न्यायालयात सादर केली गेल्याने पुढील काही वर्ष गंभीर गुन्ह्यांमध्ये शिक्षेचे प्रमाण वाढतच राहणार असल्याचे सांगण्यात आले.
आयपीसी वगळता आर्म्स अॅक्ट, दारू जुगारावरील कारवाई, इसी अॅक्ट या सारख्या विशेष स्थानिक कायद्यान्वये (एसएलएल) दाखल गुन्ह्यांमध्येसुद्धा २०१५ ला १८.८६ टक्के असलेले शिक्षेचे प्रमाण आता दुप्पटीने वाढून
३८.९० टक्क्यावर पोहोचले आहे.
लॉकडाऊन तोडणाºया ३७४ जणांना शिक्षा
गेल्या तीन महिन्यांपासून जिल्ह्यात लॉकडाऊन आहे. या काळात संचारबंदीचे उल्लंघन करणाºया व्यक्तींविरुद्ध कलम १८८ अन्वये गुन्हे नोंदविले गेले. ही प्रकरणे प्रलंबित न ठेवता लगेच न्यायालयात सादर केली गेली. न्यायालयांनीही तातडीने हे खटले निकाली काढले. त्यात तब्बल ३७४ जणांना शिक्षा झाली. दंड म्हणून त्यांच्याकडून चार लाख ९५ हजार ४०० रुपयांची रक्कम वसूल केली गेली.