आदेश येईपर्यंत नोंदणीकृत तुरीची खरेदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2018 11:28 PM2018-04-17T23:28:35+5:302018-04-17T23:28:35+5:30
केंद्र सरकारचा आदेश येईपर्यंत शेतकऱ्यांनी आॅनलाईन नोंदणी केलेल्या तुरीची खरेदी सुरू राहणार आहे. या तुरीसाठी गोदाम भाडेतत्वावर घेण्याची सूचना देण्यात आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : केंद्र सरकारचा आदेश येईपर्यंत शेतकऱ्यांनी आॅनलाईन नोंदणी केलेल्या तुरीची खरेदी सुरू राहणार आहे. या तुरीसाठी गोदाम भाडेतत्वावर घेण्याची सूचना देण्यात आली आहे. यवतमाळ जिल्ह्यातील ३३ हजार शेतकरी आजही तूर विक्रीच्या प्रतीक्षेत असून त्यांना यामुळे दिलासा मिळणार आहे.
संपूर्ण राज्यात तूर खरेदी १८ एप्रिलनंतर बंद करण्याचे निर्देश सुरुवातीला देण्यात आले होते. परंतु या कालावधीत केवळ २० टक्केच तुरीची खरेदी करता आली. त्यामुळे राज्याने केंद्र सरकारला तूर खरेदीची मुदत वाढविण्याचा प्रस्ताव दिला. या प्रस्तावाला मंजुरी मिळेपर्यंत राज्यात तुरीची खरेदी होणार आहे. १८ एप्रिलपर्यंत नोंदणी केलेल्या शेतकºयांची तूर नाफेडच्या खरेदी केंद्रावर स्वीकारली जाणार आहे. यावर्षी तूर साठविण्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. आता खरेदी केलेली तूर कुठे ठेवावी, असा प्रश्न आहे. त्यामुळे खासगी गोदाम भाडे तत्वावर घेण्याची सूचना संंबंधितांना सहकार विभागाने दिली आहे.
यवतमाळ जिल्ह्यात खरेदी झालेली तूर ठेवण्यासाठी जागाच शिल्लक नाही. गोदामासाठी वखार महामंडळाने अमरावतीच्या केंद्रीय वखार महामंडळाकडे प्रस्ताव पाठविला होता. या प्रस्तावाला मंजुरी मिळताच जिल्ह्यातील तूर त्या ठिकाणी वळती केली जाणार आहे. जिल्ह्यातील ३३ हजार शेतकºयांनी तूर विक्रीसाठी आॅनलाईन नोंदणी केली आहे. साडेतीन लाख क्ंिवटल तूर आजही शेतकºयांच्या घरी आहे. त्यातच १८ एप्रिलपासून तूर खरेदी बंद होणार असल्याने शेतकºयांची चिंता वाढली होती. मात्र आता केंद्राचा आदेश येईपर्यंत नोंदणीकृत तूर खरेदी केली जाणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकºयांना मोठा दिलासा मिळाला आहे.