तीन कोटींच्या क्रीडा साहित्याची खरेदी

By admin | Published: January 13, 2015 11:07 PM2015-01-13T23:07:04+5:302015-01-13T23:07:04+5:30

राज्यातील सर्व गावात क्रीडा विषयक पायाभूत सोयीसुविधा निर्माण व्हाव्या. खेळाडुंना अद्ययावत क्रीडा साहित्य मिळावे या उदात्त हेतूने सुरू झालेल्या क्रीडांगण विकास अनुदान या योजनेंतर्गत जिल्हा

The purchase of three crore sports literature | तीन कोटींच्या क्रीडा साहित्याची खरेदी

तीन कोटींच्या क्रीडा साहित्याची खरेदी

Next

नीलेश भगत - यवतमाळ
राज्यातील सर्व गावात क्रीडा विषयक पायाभूत सोयीसुविधा निर्माण व्हाव्या. खेळाडुंना अद्ययावत क्रीडा साहित्य मिळावे या उदात्त हेतूने सुरू झालेल्या क्रीडांगण विकास अनुदान या योजनेंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यवतमाळने ७५ ग्रामपंचायतींसह १५ शैक्षणिक संस्थांना क्रीडा साहित्य खरेदी करण्यासाठी २०१३-१४ मध्ये तब्बल दोन कोटी ७५ ग्रामपंचायतींपैकी ४२ ग्रमपंचायती एकट्या झरीजामणी तालुक्यातील आहेत.
राज्य शासनाच्या नवीन क्रीडा धोरण २०१२ नुसार क्रीडांगण विकास अनुदान योजना अंतर्गत ग्रामपंचायती, स्वयंसेवी संस्था, शैक्षणिक व क्रीडा संस्थांना क्रीडाविषयक बाबींसाठी प्रत्येकी सात लाख रुपयांचे अनुदान मिळते. पूर्वी हे अनुदान केवळ दोन लाख रुपयांचे होते. नवीन क्रीडा धोरणानुसार क्रीडा कार्यालयाने प्रथमच अनुदान दिले.
२०१३-१४ या सत्रात क्रीडा साहित्य खरेदी करण्यासाठी ९० प्रस्ताव मंजूर करण्यात आले. यात ७५ ग्रामपंचायती व १५ शैक्षणिक संस्था आहेत. यांना अनुदानाच्या पहिल्या टप्प्यात प्रत्येकी तीन लाख याप्रमाणे दोन कोटी ७२ लाख ७० हजार रुपयांचे नुदान मंजूर करण्यात आले. संबंधित ग्रामपंचायती वा संस्थांनी क्रीडा साहित्य स्वत:च खरेदी करायचे आहे. या अनुदानामुळे गट ग्रामपंचायत, गाव, तांडा आदी दुर्गम भागातील उदयोन्मुख खेळाडुंना अद्ययावत साहित्य उपलब्ध झाल्यास खेळाडुंची मोठी सोय होईल, अशी अपेक्षा व्यक्ती केली जात आहे.
(क्रीडा प्रतिनिधी)

Web Title: The purchase of three crore sports literature

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.