पूस धरण ओव्हर फ्लो
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2021 04:35 AM2021-07-25T04:35:15+5:302021-07-25T04:35:15+5:30
पुसद : शहरासाठी जीवनदायी असलेले पूस धरण शनिवारी दुपारी ओव्हर फ्लो झाले. त्यामुळे शहराचा पाणी प्रश्न निकाली निघाला आहे. ...
पुसद : शहरासाठी जीवनदायी असलेले पूस धरण शनिवारी दुपारी ओव्हर फ्लो झाले. त्यामुळे शहराचा पाणी प्रश्न निकाली निघाला आहे.
माजी मुख्यमंत्री दिवंगत वसंतराव नाईक यांच्या दूरदृष्टीतून पूस प्रकल्पाची निर्मिती करण्यात आली होती. या प्रकल्पाची पाणी पातळी ३९८.७८ मीटर असून उपयुक्त पाणीसाठा ९१.२६ दशलक्ष घनमीटर एवढा आहे. शनिवारी धरण पूर्ण भरल्यानंतर सांडव्यावरून ओव्हरफ्लो सुरू झाला. हे विहंगम दृश्य पाहण्यासाठी हौशी नागरिकांनी गर्दी केली.
संततधार पावसाने अवघ्या सात दिवसात धरणाचा जलसाठा ५० टक्क्याने वाढला आहे. यावर्षी जून महिन्याच्या सुरुवातीपासून संततधार पाऊस कोसळत असल्याने धरणाच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली. गुरुवारी सकाळी धरणाच्या सांडव्याखाली अंदाजे दोन फूट पाणी होते. या माहितीने पुसदकरांच्या आनंदाला उधाण आले.
पूस प्रकल्प साधारणतः ऑगस्ट महिन्यात सर्वाधिक वेळा भरला आहे. २००१ ते २०२१ या कालखंडात प्रथमच जून महिन्यात २०१३ मध्ये १७ तारखेला १०० टक्के भरला होता, हे विशेष. जुलै महिन्यात २००२, २०१० व २०२१ या तीन वर्षांत प्रकल्प ओव्हर फ्लो झाला. यापूर्वी पूस धरण सातदा ऑगस्ट महिन्यात भरले. त्यात २००१, २००६, २०११, २०१२, २०१६, २०१८, २०२० या वर्षांचा समावेश आहे. तसेच सप्टेंबर महिन्यात दोनदा धरण भरले होते. त्यात २००५ व २००७ या वर्षांचा समावेश आहे.