पुसद वनविभागाची जंगल सत्याग्रहींना आदरांजली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2020 06:36 PM2020-07-10T18:36:04+5:302020-07-10T18:36:33+5:30

तत्कालीन इंग्रज सरकारविरुद्ध भारतातील पहिला जंगल सत्याग्रह १० जुलै १९३० रोजी तालुक्यातील बेलगव्हाण घाटातील जंगलात झाला होता. लोकनायक बापूजी अणे यांनी या सत्याग्रहातून इंग्रज सरकारचा विरोध केला होता. या घटनेला आज ९० वर्षे पूर्ण झाली. त्याप्रीत्यर्थ शुक्रवारी वन विभाग व लोकनायक बापूजी अणे स्मारक समितीतर्फे जंगल सत्याग्रहींना आदरांजली अर्पण करण्यात आली.

Pusad Forest Department pays homage to forest satyagrahis | पुसद वनविभागाची जंगल सत्याग्रहींना आदरांजली

पुसद वनविभागाची जंगल सत्याग्रहींना आदरांजली

Next
ठळक मुद्देस्मृतिस्थळावर अभिवादन : कुरण विकास योजनेला लोकनायक बापूजी अणे यांचे नाव देण्याचा प्रस्ताव पारित

लोकमत न्यूज नेटवर्क
पुसद : तत्कालीन इंग्रज सरकारविरुद्ध भारतातील पहिला जंगल सत्याग्रह १० जुलै १९३० रोजी तालुक्यातील बेलगव्हाण घाटातील जंगलात झाला होता. लोकनायक बापूजी अणे यांनी या सत्याग्रहातून इंग्रज सरकारचा विरोध केला होता. या घटनेला आज ९० वर्षे पूर्ण झाली. त्याप्रीत्यर्थ शुक्रवारी वन विभाग व लोकनायक बापूजी अणे स्मारक समितीतर्फे जंगल सत्याग्रहींना आदरांजली अर्पण करण्यात आली.
बेलगव्हाण घाटातील जंगलातील स्मृतीस्थळी पुसद वन विभाग व लोकनायक बापूजी अणे स्मारक समितीतर्फे शुक्रवारी कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी यवतमाळचे मुख्य वनसंरक्षक रवींद्र वानखेडे यांनी लोकनायक अणे यांच्या जंगल सत्याग्रहाच्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी आर्णीचे आमदार डॉ. संदीप धुर्वे, माजी आमदार अण्णासाहेब पारवेकर, उपवनसंरक्षक अरविंद मुंढे, सहायक वनसंरक्षक विश्वास करे, वन परिक्षेत्र अधिकारी सचिन सावंत, आनंद धोत्रे, पी.पी. गंगाखेडे, वसंतराव पाटील कान्हेकर, प्रा. नारायण क्षीरसागर, राजेश आसेगावकर, संभाजी टेटर, मनीष जाधव, ज्ञानेश्वर तडसे, विनोद जिल्हेवार, अविनाश पोळकट, विजय उबाळे, भाऊ मुडाणकर, सुनील गुद्धटवार, रवी देशपांडे, प्रा. दिनकर गुल्हाने, अनिल चेंडकाळे, संजय कोरटकर, सौरभ कोरटकर आदी उपस्थित होते.
उपवनसंरक्षक मुंढे यांनी स्वातंत्र्य संग्रामातील अणे यांच्या योगदानाची माहिती दिली. तसेच स्मृतीस्थळ विकासाबाबतचा आढावा सादर केला. प्रथम सर्वांनी स्मृती स्थळावर पुष्पमाला अर्पण करुन सत्याग्रहींना आदरांजली वाहिली. यावेळी शासनाच्या कुरण विकास योजनेला लोकनायक बापूजी अणे यांचे नाव देण्याचा प्रस्ताव पारित करण्यात आला. वनरक्षक भाऊ बेले, भाऊ लहाडगे, भाऊ राठोड, पवने, खान आदींनी सहकार्य केले.

Web Title: Pusad Forest Department pays homage to forest satyagrahis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.