पुसदमध्ये सिग्नल आणि वाहनतळच नाही

By admin | Published: March 11, 2017 01:00 AM2017-03-11T01:00:10+5:302017-03-11T01:00:10+5:30

एक लाखाच्यावर लोकसंख्या असलेल्या पुसद शहरात कुठेही ट्रॅफिक सिग्नल लावण्यात आले नसून वाहनतळांचाही थांगपत्ता लागत नाही.

Pusad has no signals and no parking | पुसदमध्ये सिग्नल आणि वाहनतळच नाही

पुसदमध्ये सिग्नल आणि वाहनतळच नाही

Next

वाहतुकीची कोंडी : रस्त्यावरच वाहनांचे पार्किंग, अपघातात वाढ, सिग्नलसाठी नगरपरिषदेकडे प्रस्ताव
पुसद : एक लाखाच्यावर लोकसंख्या असलेल्या पुसद शहरात कुठेही ट्रॅफिक सिग्नल लावण्यात आले नसून वाहनतळांचाही थांगपत्ता लागत नाही. परिणामी शहरातील वाहतुकीची समस्या गंभीर झाली असून याचा ताण वाहतूक शाखेसह नागरिकांनाही सहन करावा लागत आहे.
पुसद शहर आणि लगतच्या ग्रामपंचायतीची लोकसंख्या लाखाच्या आसपास आहे. वाढती लोकसंख्या आणि त्यामुळे वाढणारी वाहनांची संख्या शहरात समस्या निर्माण करीत आहे. पुसद शहरातील रस्ते आधीच अरुंद असून या रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले आहे. त्यामुळे वाहतूक विस्कळीत होण्याचे प्रकार वारंवार घडतात. शहरात कुठेही ट्रॅफिक सिग्नल लावलेले नाही. वाहतूक पोलिसांना वाहतूक नियंत्रित करावी लागते. परंतु शहरातील रस्त्यावरील हातगाड्यांना बाजूला सारतानाच त्यांची शक्ती खर्च होते, तर काही चौकात वाहतूक पोलीसच दिसत नाही. येथील गजबजलेल्या शिवाजी चौकात चारही बाजूने येणारी वाहने शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला वळसा घालतात. त्यावेळी अपघात होण्याची शक्यता असते. भरधाव वाहनांच्या मध्ये पायदळ चालणाऱ्यांचाही गोंधळ सुरू असतो.
शहरातील बसस्थानकासमोर आॅटोरिक्षाचालकांचा कायम धुमाकूळ सुरू असतो. विक्रेत्यांनी आपली दुकाने थेट डांबरी रस्त्यालगत लावली आहे. आधीच दुभाजकामुळे रस्ता अरुंद झाला असून या दुकानांमुळे पायदळ चालणाऱ्यांना थेट रस्त्याच्या मधोमध चालावे लागते. त्यामुळे येणाऱ्या वाहनांना अडचणीचे जाते. तसेच खरेदी व इतर व्यवहारासाठी येणारे नागरिकही रस्त्यावरच वाहने उभी करतात. कारण पार्कींगसाठी आवश्यक जागाच सोडण्यात आली नाही. ही समस्या गेल्या कित्येक वर्षापासूनची आहे. यामुळे अपघाताच्या प्रमाणात वाढ होत आहे. शहरातील इतरही परिसरात अशीच अवस्था दिसून येते. भरधाव जाणाऱ्या दुचाकी अनेकांच्या काळजाचा ठोका चुकवितात.
पुसद शहरातील शिवाजी चौक आणि बसस्थानकासमोर ट्रॅफिक सिग्नलची आवश्यकता आहे. या ठिकाणी सिग्नल लावल्यास स्वयंचलित पद्धतीने वाहतूक नियंत्रित होवू शकते. यासाठी येथील वाहतूक उपशाखेने नगरपरिषदेकडे प्रस्ताव पाठविला आहे. परंतु अद्याप तरी या प्रस्तावावर उपाययोजना झाली नाही. तसेच शहरात अपवाद वगळता कुठेही वाहनतळ दिसत नाही. केवळ बसस्थानकाच्या आवारात वाहनतळ आहे. शहरात इतर ठिकाणी कुठेही पार्किंगची व्यवस्था नाही. बाजारात खरेदीसाठी चारचाकी वाहन घेवून जाणे म्हणजे अंगावर काटा आणण्यासारखा प्रकार आहे. वाहन पार्किंग करताना जागेची शोधाशोध करण्याच्या वेळात खरेदी होवू शकते. त्यामुळे अनेकजण चारचाकी वाहनाऐवजी दुचाकीनेच बाजारात येतात. परंतु दुचाकी उभी करतानाही दुकानदार आणि इतरांचे बोलणे ऐकावे लागते. (कार्यालय चमू)

Web Title: Pusad has no signals and no parking

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.