पुसद पालिकेने दुकान भाडे, मालमता कर माफ करावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2021 04:39 AM2021-05-17T04:39:08+5:302021-05-17T04:39:08+5:30
व्यापाऱ्यांना शासनाची कोणतीही मदत मिळत नाही. सर्व परिस्थितीला तोंड देणे व्यापाऱ्यांच्या हाताबाहेर गेले आहे. अशा अवस्थेत पालिका संकुलातील व्यापारी ...
व्यापाऱ्यांना शासनाची कोणतीही मदत मिळत नाही. सर्व परिस्थितीला तोंड देणे व्यापाऱ्यांच्या हाताबाहेर गेले आहे. अशा अवस्थेत पालिका संकुलातील व्यापारी वर्गाचे दुकान भाडे व मालमता कर माफ करण्याची मागणी चेंबर ऑफ कॉमर्सच्या वतीने करण्यात आली आहे. पुसद चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष सूरज डुबेवार यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने आमदार इंद्रनील नाईक, आमदार डॉ. वजाहत मिर्झा यांची भेट घेऊन निवेदन दिले.
सूरज डुबेवार यांनी व्यापारी मागील एक वर्षापासून लॉकडाऊनमुळे कसे आर्थिक डबघाईस आले, हे आमदारांना समजावून सांगितले. चेंबर ऑफ कॉमर्सच्या मागणीवर सहानुभूतीने विचार केला जाईल, असे आश्वासन दोन्ही आमदारांनी दिले. पालिकेची आमसभा बोलावून ठराव मंजूर करून घेऊ, अशी ग्वाही त्यांनी दिली. यावेळी शरद मैंद उपस्थित होते. व्यापारी सर्वांच्या मदतीला धावून जातात. ते संकटात असताना नगर परिषदेने योग्य मार्ग काढला पाहिजे, असे मत शरद मैंद यांनी व्यक्त केले.