पुसदला १२ लाखांचे सागवान जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2018 09:55 PM2018-07-30T21:55:33+5:302018-07-30T21:55:53+5:30
पुसद वनपरिक्षेत्रांतर्गत खंडाळा वनवर्तुळातील अमृतनगरात पोलीस, वन व महसूलच्या संयुक्त पथकाने घराघरात सर्च करून सुमारे १२ लाख रुपयांचे सागवान जप्त केले. सोमवारी केल्या गेलेल्या या संयुक्त कारवाईने सागवान तस्करांचे धाबे दणाणले आहे. गेल्या कित्येक वर्षात पुसद विभागात पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात धडक कारवाई केली गेली.
Next
ठळक मुद्देसंयुक्त कारवाई : खंडाळा वनवर्तुळातील अमृतनगरात घराघरांत ‘सर्च’
<p>लोकमत न्यूज नेटवर्कपुसद : पुसद वनपरिक्षेत्रांतर्गत खंडाळा वनवर्तुळातील अमृतनगरात पोलीस, वन व महसूलच्या संयुक्त पथकाने घराघरात सर्च करून सुमारे १२ लाख रुपयांचे सागवान जप्त केले. सोमवारी केल्या गेलेल्या या संयुक्त कारवाईने सागवान तस्करांचे धाबे दणाणले आहे. गेल्या कित्येक वर्षात पुसद विभागात पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात धडक कारवाई केली गेली.
पुसदचे उपवनसंरक्षक अरविंद मुंढे (आयएफएस) यांच्या मार्गदर्शनात सागवान तस्करांवर जरब बसविणारा हा सर्च राबविला गेला. वन क्षेत्रनिहाय कर्मचाऱ्यांची चमू तयार करून अमृतनगरात घरोघरी झडती घेण्यात आली. प्रत्येक वन पथकासोबत पाच पोलीस कर्मचारी व दोन केंद्रीय राखीव दलाचे जवान देण्यात आले होते. या तपासणीत अवैध तोडीचा सागवान (गोल माल), चौरस नग व त्यापासून तयार केलेले पलंग, चारपाई जप्त करण्यात आल्या. हा माल येलदरी तपासणी नाक्यावर साठविण्यात आला. सदर सागवान अंदाजे २५ ते ३० घनमीटर असून बाजार भावानुसार त्याची किंमत १० ते १२ लाख रुपये आहे.
सहायक वनसंरक्षक बी.एन. पायघन, सहायक वनसंरक्षक बी.के. करे, उमरखेड उपविभागीय वनअधिकारी अमोल थोरात, पुसदचे वनपरिक्षेत्र अधिकारी एस.बी. गिरी, मारवाडीचे डी.जी. पवार, शेंबाळपिंपरीचे एस.एस. सावंत, महागावचे हेमंत उबाळे, काळी (दौ.)चे एस.एस.पवार, फिरत्या पथकाचे आर.जी. रत्नपारखी, खंडाळाचे ठाणेदार ठाकूर आदींच्या नेतृत्वात ही कारवाई केली गेली.
१७ जुलै रोजी राबविलेल्या सर्चमध्ये अनेक घरात अवैध सागवान असल्याचे आढळून आले होते. हे सागवान जप्त करण्यासाठी वन विभागाने महसूल व पोलीस अधिकाºयांच्या मदतीने हा सर्च केला.