पुसद तालुक्यात भीषण पाणीटंचाईचा पिकांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2019 10:09 PM2019-05-24T22:09:06+5:302019-05-24T22:09:34+5:30

सूर्य आग ओकत असल्यामुळे तालुक्यात भूजल पातळी झपाट्याने खालावली. विहीर, बोअर कोरडे पडले आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासह सिंचनाचा प्रश्न ऐरणीवर आला. भीषण पाणीटंचाईमुळे तालुक्यातील उन्हाळी पिकांना फटका बसत आहे.

In Pusad taluka, severe water scarcity crops hit | पुसद तालुक्यात भीषण पाणीटंचाईचा पिकांना फटका

पुसद तालुक्यात भीषण पाणीटंचाईचा पिकांना फटका

Next
ठळक मुद्देकेळी बागा करपल्या : शेतकरी संकटात, आर्थिक नुकसानीत भर

लोकमत न्यूज नेटवर्क
पुसद : सूर्य आग ओकत असल्यामुळे तालुक्यात भूजल पातळी झपाट्याने खालावली. विहीर, बोअर कोरडे पडले आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासह सिंचनाचा प्रश्न ऐरणीवर आला. भीषण पाणीटंचाईमुळे तालुक्यातील उन्हाळी पिकांना फटका बसत आहे.
उन्हाचा तडाखा सतत वाढत आहे. परिणामी पाण्याची पातळी दिवसेंदिवस खालावत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर सिंचनाचा प्रश्न उभा ठाकला आहे. शेतात उन्हाळी पीक उभे आहे. मात्र विहीर, बोअर आटल्याने सिंचन करणे अवघड झाले आहे. डोळ्यादेखत पिके वाळत आहे. यामुळे शेतकरी राजा पुरता हतबल झाला आहे. तालुक्यातील सेलू, भोजला, मुंगशी, जामबाजार, एरंडा, कोपरा आदी परिसरात केळीच्या बागा मोठ्या प्रमाणात आहे. मात्र दुष्काळ व अति उष्ण तापमानामुळे बागा करपत आहे. तालुक्यातील शेकडो हेक्टरवरील केळी धोक्यात आल्याने अर्थकारण अडचणीत सापडले. अति उष्ण तापमानामुळे पिल बाग, दुबार बहर असलेली बाग, निसवणीवर आलेले केळीचे धड तुटून नुकसान होत. काही बागांमध्ये केळीचे खोड मधून तुटून पडत आहे. उष्णतेची लाट कायम राहिल्यास नुकसान होणार आहे.
पीक जगविण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड
यावर्षी तालुक्यावर दुष्काळाचे संकट ओढवले. केळी उत्पादक ठिबक, तुषार सिंचन किंवा प्रसंगी टँकरने पाणी आणून मोठ्या मेहनतीने केळी बाग जगविण्याची धडपड करीत आहे. मात्र अति उष्णेमुळे बागा करपत आहे. हातातोंडाशी आलेला घास हिरावला जात आहे. केळी बागांचे नुकसान, ही नैसर्गिक आपत्ती मानली जात नसल्याने शेतकºयांना पीक विम्याचा दावा करता येत नाही.

Web Title: In Pusad taluka, severe water scarcity crops hit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.