पुसदच्या शिक्षिकेचा मृत्यू, ४० नवे कोरोना पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2020 05:00 AM2020-07-24T05:00:00+5:302020-07-24T05:00:16+5:30
गुरुवारी कोरोनाने दगावलेली ५६ वर्षीय महिला पुसदच्या श्रीरामपूर येथील रहिवासी आणि धुंदी जिल्हा परिषद शाळेतील मुख्याध्यापिका होत्या. नव्याने आढळलेल्या ४० रुग्णांमध्ये २५ पुरुष आणि १५ महिलांचा समावेश आहे. यात सर्वाधिक १३ रुग्ण पांढरकवडा येथील असून ११ पुरुष आणि दोन महिलांचा समावेश आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : गुरुवारी दिवसभरात जिल्ह्यात आणखी ४० कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली. तर पुसद येथील एका शिक्षिकेचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्याचवेळी वसंतराव नाईक वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वार्डातून आठ जणांना कोरोनामुक्त झाल्यामुळे सुटी देण्यात आली.
गुरुवारी कोरोनाने दगावलेली ५६ वर्षीय महिला पुसदच्या श्रीरामपूर येथील रहिवासी आणि धुंदी जिल्हा परिषद शाळेतील मुख्याध्यापिका होत्या. नव्याने आढळलेल्या ४० रुग्णांमध्ये २५ पुरुष आणि १५ महिलांचा समावेश आहे. यात सर्वाधिक १३ रुग्ण पांढरकवडा येथील असून ११ पुरुष आणि दोन महिलांचा समावेश आहे. दिग्रस येथील पाच पुरुष व तीन महिला, पुसद येथील तीन पुरुष व एक महिला, वणी येथील एक पुरुष, यवतमाळ शहरातील साईनाथ ले-आऊटमधील एक पुरुष, यवतमाळ येथील दोन पुरुष व तीन महिला, दारव्हा येथील एक पुरुष व पाच महिला आणि आर्णीतील एका पुरुषाचा समावेश आहे.
सध्याच्या २१९ अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांपैकी १४४ जण विषाणू संशोधन व निदान प्रयोगशाळेतील चाचणीद्वारे आढळले आहेत. तर ७५ जण रॅपिड अॅन्टीजन टेस्टद्वारे पॉझिटिव्ह आले आहेत. जिल्ह््यातील आतापर्यंतच्या रुग्णांची संख्या ६८९ झाली आहे.
अॅक्टिव्ह रुग्ण २१९
वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वार्डात सध्या २१९ अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरु आहे. गुरुवारी ४० रुग्ण वाढलेले असतानाच एका महिलेचा मृत्यू झाला. तर आठ जणांना सुटी देण्यात आली.