कोविड तपासणीला पुसदच्या व्यापाऱ्यांचा प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2021 04:39 AM2021-03-07T04:39:11+5:302021-03-07T04:39:11+5:30
पुसद ...... शहर व तालुक्यात कोरोनाची साखळी उद्ध्वस्त करण्याकरिता प्रशासन विविध उपायोजना करून खंबीर पावले उचलत आहे. यातूनच २५० ...
पुसद ...... शहर व तालुक्यात कोरोनाची साखळी उद्ध्वस्त करण्याकरिता प्रशासन विविध उपायोजना करून खंबीर पावले उचलत आहे. यातूनच २५० व्यापाऱ्यांनी कोरोना चाचणी करवून घेतली.
कोरोना संक्रमण थोपवण्यासाठी सर्वांनी गांभीर्याने प्रयत्न करणे गरजेचे आहे. येथे कोरोना तपासणी शिबिर घेतले जात आहे. या शिबिराला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देत पुसदकर तपासणी करून घेत आहेत. येथील व्यापारी बांधवांनी मोठ्या प्रमाणात कोरोना तपासणी शिबिराला उस्फूर्त प्रतिसाद दिला. शनिवारी २५० व्यापाऱ्यांनी कोविड तपासणी केली.
उपविभागीय अधिकारी डॉ. व्यंकट राठोड, मुख्याधिकारी डॉ. किरण सुकलवाड यांच्या आवाहनाला प्रतिसाद मिळत आहे. शहरात कोरोना लसीकरणालाही मोठ्या प्रमाणात सुरुवात झाली आहे. ४५ ते ६० वर्षांवरील व्यक्तींंना पूर्वीचे आजार असल्यास कोरोना लस दिली जात आहे. ६० वर्षांवरील व्यक्तींनाही लस देण्यात येत आहे. तसेच फ्रन्टलाईन वर्कर कर्मचाऱ्यांना लस दिली जात आहे.
कोरोनाची वाढती व्याप्ती लक्षात घेता, शासन निर्देशानुसार नागरिक, दुकानदार, व्यापाऱ्यांनी कोरोना स्वॅब तपासणी करण्याबाबत प्रशासनाने निर्देश दिले आहेत. तपासणी शिबिराचे आयोजन येथील सार्वजनिक वाचनालयात सकाळी ११ ते दुपारी २ वाजेपर्यन्त करण्यात आले आहे.