पुसद, उमरखेड, महागाव, हिवरात कडकडीत बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2018 10:39 PM2018-07-24T22:39:18+5:302018-07-24T22:39:46+5:30

मराठाला समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मंगळवारी पुसद, उमरखेड, महागाव तालुक्यात कडकडीत बंद पाळण्यात आला. काकासाहेब शिंदे (२८) या तरुण आंदोलकाने आरक्षणाच्या मागणीसाठी गोदावरी नदीत उडी घेऊन बलिदान दिले. यामुळ सकल मराठा समाज आक्रमक झाला.

Pusad, Umarkhed, Mahagaon, Havar and Kadadadi closed | पुसद, उमरखेड, महागाव, हिवरात कडकडीत बंद

पुसद, उमरखेड, महागाव, हिवरात कडकडीत बंद

Next
ठळक मुद्देसकल मराठा समाज : आरक्षण तत्काळ लागू करण्याची मागणी, उमरखेडमध्ये दुचाकी रॅली, काकासाहेब शिंदे यांना सामूहिक श्रद्धांजली

लोकमत न्यूज नेटवर्क
पुसद/उमरखेड/महागाव : मराठाला समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मंगळवारी पुसद, उमरखेड, महागाव तालुक्यात कडकडीत बंद पाळण्यात आला. काकासाहेब शिंदे (२८) या तरुण आंदोलकाने आरक्षणाच्या मागणीसाठी गोदावरी नदीत उडी घेऊन बलिदान दिले. यामुळ सकल मराठा समाज आक्रमक झाला. मंगळवारी बंद पुकारण्यात आला. पुसदमध्ये ठिय्या आंदोलन करण्यात आले.
उमरखेडची बाजारपेठ बंद
उमरखेडमध्ये शहरातील बाजारपेठ कडकडीत बंद होती. दुपारी छत्रपती चौकात काकासाहेब शिंदे यांना सामूहिक श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी राम देवसरकर, भीमराव चंद्रवंशी, गजानन कदम, वैभव माने, रंगराव कदम, विजय चौधरी, शिवाजी चव्हाण, शिवाजी माने, डॉ.अजय नरवाडे, गजानन शिंदे, अरविंद भोयर, प्रदीप बाभूळकर, अमोल पंतिगराव, रामकिसन वानखेडे, बंडू पाटील, उतमराव वानखेडे, अ‍ॅड.संजीव जाधव, अ‍ॅड.बळीराम मुटकुळे, अ‍ॅड.युवराज देवसरकर, अ‍ॅड.गौरव चंद्रवंशी, अ‍ॅड.जितेद्र्र पवार, संचिन घाडगे, बाळासाहेब चौधरी, गुणवंत सूर्यवंशी, चक्रधर देवसरकर, स्वप्नील कनवाळे, उत्तमराव जाधव, संदीप ठाकरे, बालाजी वानखेडे, सरोज देशमुख, आशा देवसरकर, वंदना कदम, नंदा तावडे, सुरेखा जाधव, सुरेखा माकोडेसह समाज बांधव उपस्थित होते. ठाणेदार हनुमंत गायकवाड यांच्या मार्गदर्शनात पोलीस बंदोबस्त होता.
महागावमध्ये मोर्चा
महागावमध्ये सकल मराठा समाजाने मोर्चा काढला. शहरातील प्रमुख मार्गाने रॅली काढून हा मोर्चा तहसीलवर धडकला. तत्पूर्वी बसस्थानक परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या तैलचित्रांना अभिवादन केले. तेजस नरवाडे, प्रवीण ठाकरे, प्रमोद जाधव, डॉ.संदीप शिंदे, गजानन वाघमारे, शैलेश कोपरकर आदींनी मनोगत व्यक्त केले. नंतर कमळेश्वर मंदिरात बैठक झाली. त्यात २७ जुलैला धनोडा टी-पॉर्इंटवर रास्ता रोको आंदोलनाचा निर्णय झाला. मोर्चात उदय नरवाडे, सुनील नरवाडे, अमोल भरवाडे, बाळू नरवाडे, एम.डी. सुरोसे, अमोल शिंदे, प्रवीण नरवाडे, गणेश भोयर, रवी कोपरकर, पंकज देशमुख, समीर नरवाडे, सुरेश नरवाडे, संदीप ठाकरे, सतीश ठाकरे, अ‍ॅड.विवेक देशमुख, डॉ.अरुण पाटील, सुदर्शन कदम, शिवराज ठाकरे, राम तंबाखे, सुनील भरवाडे, सुभाष नरवाडे, हंसराज मोरे, मंचकराव कदम, सचिन कोपरकर, प्रवीण गावंडे, गोलू गावंडे, शैलेश वानखडे, प्रतीक अडकिने, किशोर सोळंके यांच्यासह समाज सहभागी झाले होते. तसेच हिवरा-संगम येथे गावातील किराणा संघटना, कापड संघटना, कृषी केंद्र संघटना व व्यापारी संघटनांनी उत्स्फूर्तपणे बंद पाळला.
पुसद तहसील कार्यालयासमोर ठिय्या
पुसद येथील तहसीलसमोर सकल मराठा समाजाने ठिय्या आंदोलन केले. यात सकल मराठा-कुणबी समाज, मराठा-कुणबी क्रांती मोर्चा, मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेड, मराठा-कुणबी युवा मंच, मराठा महिला मंडळाचे कार्यकर्ते सहभागी होते. आंदोलनात अ‍ॅड.आशीष देशमुख, प्रकाश पानपट्टे, नितीन पवार, अशोक बाबर, सुधीर देशमुख, राजेश साळुंके, डी.पी. जगताप, गणेश पागिरे, प्रवीण कदम, जीवा जाधव, चंद्रकांत ठेंगे, शशांक गावंडे, गणेश पावडे, राजू भिताडे, किरण देशमुख, मनीष ठाकरे, करण ढेकळे, दीपक जाधव, डॉ.तळणकर, दीपक काळे, उत्तम वानखेडे, सचिन भिताडे, गजानन जाधव, प्रशांत गावंडे, गोपाल सुरोशे, अ‍ॅड.विनोद पाटील, अ‍ॅड.गजानन देशमुख, अ‍ॅड.सुचिता नरवाडे, अ‍ॅड.छाया देशमुख, प्रा.संध्या कदम, अलका भिताडे, अ‍ॅड.आदित्य माने, अ‍ॅड.विकास खंदारे, अ‍ॅड.भारत जाधव, प्रा.पंडितराव देशमुख, प्रा.अशोक गायकवाड, प्रा.प्रकाश लामणे, मधुकर वाळूकर, गजानन सुरोशे, परेश पांगारकर, प्रभाकर टेटर, प्रतीक चव्हाण, मारोती काळे, गुणवंत ठेंगे, हरिभाऊ ठाकरे, संदीप चौधरी, मंचकराव देशमुख, विकास पानपट्टे आदी सहभागी होते.

Web Title: Pusad, Umarkhed, Mahagaon, Havar and Kadadadi closed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.