पुसद अर्बन बँकेचे सामाजिक कार्य कौतुकास्पद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 7, 2018 09:41 PM2018-06-07T21:41:15+5:302018-06-07T21:41:15+5:30
शरीर स्वास्थ्य चांगले राहण्यासाठी जिमची तर बौद्धिक विकासासाठी स्टडी सर्कलची आवश्यकता असते. या दोन्ही बाबी भावी नागरिक घडविण्याचे महत्त्वपूर्ण काम करतात.
लोकमत न्यूज नेटवर्क
पुसद : शरीर स्वास्थ्य चांगले राहण्यासाठी जिमची तर बौद्धिक विकासासाठी स्टडी सर्कलची आवश्यकता असते. या दोन्ही बाबी भावी नागरिक घडविण्याचे महत्त्वपूर्ण काम करतात. अगदी हीच बाब हेरून पुसद अर्बन बँकेने अध्यक्ष शरद मैंद यांच्या नेतृत्वात स्टडी सर्कल व पोलीस चौकीची उभारणी केली. त्यांचे हे सामाजिक कार्य कौतुकास्पद आहे, असे प्रतिपादन आमदार मनोहरराव नाईक यांनी गुरुवारी येथे केले.
येथील देशभक्त शंकरराव सार्वजनिक वाचनालयाने उपलब्ध करून दिलेल्या अभ्यासिकेच्या जागेवर पुसद अर्बन बँक स्टडी सर्कलची निर्मिती करण्यात आली, तर छत्रपती शिवाजी चौकालगत शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुसज्ज पोलीस चौकी स्थापन करण्यात आली. त्याचे लोकार्पण आमदार नाईक यांच्या हस्ते झाले. सहायक पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल अध्यक्षस्थानी होते. प्रमुख पाहुणे माजी आमदार विजय पाटील चोंढीकर, उपविभागीय अधिकारी नितीनकुमार हिंगोले, भाजपा नेते अॅड.निलय नाईक, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ.वजाहत मिर्झा, शिवसेनेचे नते राजन मुखरे, माजी नगराध्यक्ष सतीश बयास, मुख्याधिकारी निर्मला राशीनकर, अॅड.आशीष देशमुख, बँकेचे अध्यक्ष शरद मैंद, उपाध्यक्ष राकेश खुराणा, डॉ.मो.नदीम, ठाणेदार धनंजय सायरे, योगेश राजे उपस्थित होते.
प्रास्ताविकातून शरद मैंद यांनी पुसद अर्बन बँकेच्या सामाजिक उपक्रमांचा आढावा घेतला. संचालन मनीष अनंतवार यांनी तर आभार ललीत सेता यांनी मानले.
कार्यक्रमाला संचालक अॅड.आप्पाराव मैंद, के.आय. मिर्झा, क्रांती कामारकर, विनायक डुबेवार, निळकंठ पाटील, प्रवीर व्यवहारे, निरंजन मानकर, सुदीप जैन, अविनाश अग्रवाल, वंदना पाटील, प्रमोदिनी पावडे, भैयालाल टाक, उल्हास पवार, प्रवीण गांधी, सूरज डुबेवार, यशवंत चौधरी, के.जी. चव्हाण, धनंजय सोनी, पांडुरंग चोपडे, संतोष अग्रवाल, कैलास जगताप, सुशांत महल्ले, रियासत अली, सुधीर देशमुख, अमोल व्हडगिरे, राजेश विश्वकर्मा, राजेंद्र भिताडे उपस्थित होते.