पुसद अर्बन बँकेची आभासी आमसभा उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2021 04:41 AM2021-03-21T04:41:09+5:302021-03-21T04:41:09+5:30
कोरोना काळामुळे गर्दी टाळण्याच्या हेतूने शासन निर्देशानुसार आभासी पद्धतीने झालेल्या आमसभेच्या अध्यक्षस्थानी बँकेचे अध्यक्ष शरद मैंद होते. त्यांनी अहवाल ...
कोरोना काळामुळे गर्दी टाळण्याच्या हेतूने शासन निर्देशानुसार आभासी पद्धतीने झालेल्या आमसभेच्या अध्यक्षस्थानी बँकेचे अध्यक्ष शरद मैंद होते. त्यांनी अहवाल वाचन करून बँकेचा २०१९-२०चा आर्थिक लेखाजोखा सभेपुढे मांडला. नंतर सभासदांसाठी झालेल्या प्रशिक्षण कार्यक्रमात अध्यक्ष शरद मैंद यांनी केंद्र शासनाच्या ९७व्या घटनादुरुस्तीमध्ये असलेल्या क्रियाशील व अक्रियाशील सभासदांबाबत माहिती देताना सभासदांना निवडणूक प्रक्रियेत सहभागासाठी ५ वर्षांच्या कारकिर्दीमध्ये किमान एकदा आमसभेला उपस्थित राहणे अनिवार्य असल्याचे सांगितले. प्रत्येक सभासदाचा एक भाग (शेअर) किमान ५०० रुपयांचा असणे आवश्यक असून कोणत्याही प्रकारची सरासरी एक हजार रुपयांची ठेव किंवा कमीत कमी एक लाख रुपये कर्ज, केवायसी पूर्तता अनिवार्य, व्हॉट्स ॲप मोबाइल नंबर, ई-मेल आयडी संबंधित शाखा किंवा मुख्य कार्यालयाला द्यावा लागेल, असेही स्पष्ट केले.
याच प्रशिक्षण कार्यक्रमात बँकेच्या माहिती व तंत्रज्ञान विभागाचे अभिषेक अणे यांनी विविध सोयीसुविधायुक्त बँकेच्या मोबाइल ॲपची माहिती दिली. सभेचे संचालन प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक सेवकर, तर आभार उपाध्यक्ष राकेश खुराणा यांनी मानले. सभेला ज्येष्ठ संचालक ॲड. अप्पाराव मैंद, के.आय. मिर्झा, ललित सेता, विनायक डुब्बेवार, प्रवीर व्यवहारे, अविनाश अग्रवाल, नीलकंठ पाटील, बाळासाहेब पाटील कामारकर, सुदीप जैन, प्रवीण गांधी, भैयासाहेब मानकर, उल्हास पवार, भय्यालाल टाक, प्रमोदिनी अतुल पावडे, वंदना शरद पाटील यांच्यासह शेकडो सभासद जुळले होते.
बॉक्स
सभासदांना एक लाखाचा अपघात विमा लाभ
मुदत ठेवीचे वार्षिक व्याज ४० हजारांपेक्षा जास्त (ज्येष्ठ नागरिक ५० हजार) जात असेल, तर पॅनकार्ड व फॉर्म ब १५ जी/१५ एच भरावा लागेल. तसेच केंद्र शासनाच्या निर्देशानुसार रिजर्व बँकेने ४ फेब्रुवारी २०२० पासून ठेवीदारांच्या ठेवींना एक लाखाऐवजी पाच लाख रुपयांचे संरक्षण दिल्याची माहिती शरद मैंद यांनी दिली. तसेच बँकेतर्फे सर्व सभासदांना एक लाख रुपयांचा अपघाती विमा लाभ दिला जात असल्याचे सांगितले. बँकेच्या खात्यासंदर्भात कोणतीही गोपनीय माहिती फोनवर किंवा वैयक्तिक दिल्यास व आर्थिक नुकसान झाल्यास बँक जबाबदार राहणार नसल्याचे अध्यक्ष मैंद यांनी स्पष्ट केले.