पुसदची आरोग्य यंत्रणा सुस्तावली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2018 11:37 PM2018-09-16T23:37:01+5:302018-09-16T23:39:01+5:30

विविध प्रकारच्या आजाराने सर्वत्र थैमान घातले आहे. मात्र शासकीय रुग्णालयांची यंत्रणा सुस्तावली आहे. परिणाम गरीब नागरिकांनाही खासगी रुग्णालयांचा आधार घ्यावा लागत आहे.

 Pusad's health system | पुसदची आरोग्य यंत्रणा सुस्तावली

पुसदची आरोग्य यंत्रणा सुस्तावली

Next
ठळक मुद्देरुग्णसंख्येत वाढ : अधिकारी, कर्मचाऱ्यांना मुख्यालयाचे वावडे

लोकमत न्यूज नेटवर्क
पुसद : विविध प्रकारच्या आजाराने सर्वत्र थैमान घातले आहे. मात्र शासकीय रुग्णालयांची यंत्रणा सुस्तावली आहे. परिणाम गरीब नागरिकांनाही खासगी रुग्णालयांचा आधार घ्यावा लागत आहे. यात त्यांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. आरोग्य विभागाच्या वरिष्ठांनी याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.
पावसाचे पाणी साचून राहिल्याने डासांचा प्रादुर्भाव प्रचंड प्रमाणात वाढला आहे. यातूनच डेग्यूची लक्षणे दिसत असलेले रुग्ण उपचारार्थ रुग्णालयात दाखल होत आहे. स्क्रब टायफसची लोकांमध्ये प्रचंड दहशत आहे. अशावेळी सरकारी रुग्णालयात तत्काळ आणि प्रभावी उपचार होणे अपेक्षित आहे. मात्र या रुग्णालयाचे अधिकारी आणि कर्मचारीही लोकांच्या आरोग्या प्रती गंभीर नाही.
प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र याठिकाणी कार्यरत असलेल्या कर्मचाºयांसाठी निवासस्थाने बांधलेली आहे. त्याचा उपयोग अपवादानेच घेतला जात आहे. अधिकारी तर सोयीच्या ठिकाणाहून ड्युटी सांभाळत आहे. रुग्णालय सुरू झाल्यानंतर उपचारासाठी नागरिक डॉक्टरच्या प्रतिक्षेत थांबून असतात. तापाने फणफणत असलेला रुग्णांना तत्काळ उपचार मिळावा अशी आशा असते. परंतु डॉक्टरच वेळेवर येत नाही. रुग्णालयात वाढलेल्या गर्दीमुळे थातूरमातूर तपासणी करून औषधोपचार केला जातो. बरेच दिवसपर्यंत रुग्ण या आजारातून बाहेर पडत नाही.
अधिकाºयांसोबतच कर्मचारीही रुग्णालयातच वेळेवर पोहोचत नाही. औषधोपचाराची माहिती योग्यरित्या दिली जात नाही. दाखल असलेल्या रुग्णांना योग्य सुविधा मिळत नाही. यासर्व कारणांमुळे नागरिक खासगी रुग्णालयांकडे धाव घेतात. उधार उसनवार करून शहरातील दवाखान्यात उपचार घेतात. कोट्यवधी रुपये खर्चून उभारलेले प्राथमिक आरोग्य केंद्र नामधारी ठरत आहे. आरोग्य विभागाचे वरिष्ठही याप्रकाराकडे डोळेझाक करीत असल्याचे दिसून येते.
लोकप्रतिनिधींकडून निराशा
स्थानिक पातळीवरील लोकप्रतिनिधींकडूनही लोकांच्या पदरी निराशा येत आहे. सरकारी रुग्णालयांचा कारभार सुधारण्याच्या दृष्टीने त्यांच्याकडून प्रयत्न होताना दिसत नाही. अनेक ठिकाणी सोईची भूमिका घेतली जाते. यात त्रास मात्र गरीब लोकांना होत आहे.

Web Title:  Pusad's health system

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.