पुसदच्या ‘त्या’ ठाणेदाराला अटक करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2018 11:37 PM2018-05-20T23:37:04+5:302018-05-20T23:37:04+5:30
पुसद येथील भीमा हाटे या तरुणाच्या मृत्यूप्रकरणी तेथील ठाणेदाराला अटक करावी, या मागणीसाठी भारिप-बहुजन महासंघाने शनिवारी येथील तहसील समोर निदर्शने केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
घाटंजी : पुसद येथील भीमा हाटे या तरुणाच्या मृत्यूप्रकरणी तेथील ठाणेदाराला अटक करावी, या मागणीसाठी भारिप-बहुजन महासंघाने शनिवारी येथील तहसील समोर निदर्शने केली.
पुसद येथील भीमा तुकाराम हाटे याला अटक केल्यानंतर ठाणेदारांनी त्यांच्या कक्षात त्याला बेदम मारहाण केल्याचा आरोप भारिप-बमसंने केला आहे. त्यामुळे त्याची प्रकृती खालावली. त्याला प्रथम पुसद येथील दवाखान्यात व नंतर मेघे सावंगी येथील रूग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूला ठाणेदार व इतर पोलीस कर्मचारी जबाबदार असून त्यांच्याविरूद्ध खुनाचा गुन्हा दाखल करावा, त्यांना अटक करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.
भारिप-बहुजन महासंघाच्या तालुका शाखेने शनिवारी येथील तहसीलसमोर तीव्र निदर्शने करून महाराष्ट्र शासनाच्या गृह खात्यावर तीव्र संताप व्यक्त केला. मागणी मान्य न झायास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला. नयाब तहसीलदार मेंढे यांना निव९दन देताना भारिप-बमसंचे तालुकाध्यक्ष संघपाल कांबळे, शंकर येलादे,सतीश रामटेके, सचिन राठोड, निखील टिपले, उमेश कुडमथे, विरेंद्र पिलावन, सागर भरणे, दीक्षांत वासनिक, नरेश तुकीर्ले, सुधीर करिकांत, सुरेश हुमे, अजय खोब्रागडे, विलास जाधव, रमेश पाटील, आदी उपस्थित होते.