विडूळ पीएचसीची रुग्णवाहिका दे धक्का
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:52 AM2021-07-07T04:52:08+5:302021-07-07T04:52:08+5:30
विडूळ : येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची रुग्णवाहिका बेभरवशाची झाली आहे. अनेकदा रुग्णांच्या नातेवाईकांनी रुग्णवाहिकेला धक्का देऊनही ती सुरू होत ...
विडूळ : येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची रुग्णवाहिका बेभरवशाची झाली आहे. अनेकदा रुग्णांच्या नातेवाईकांनी रुग्णवाहिकेला धक्का देऊनही ती सुरू होत नाही. त्यामुळे ही रुग्णवाहिका विडूळसाठी भुईला भार झाली आहे.
दोन वर्षांपासून नवीन रुग्णवाहिकेसाठी अनेकदा साकडे घालण्यात आले. मात्र, नवीन रुग्णवाहिका मिळत नाही. त्यामुळे अनेक अत्यवस्थ रुग्णांना शहरातील मोठ्या रुग्णालयात हलविण्यासाठी खासगी वाहनांचा सहारा घ्यावा लागतो. परिणामी गोरगरीब रुग्णांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागतो. रुग्णवाहिकेअभावी रुग्णांच्या जिवावर बेतण्याची वेळ येते.
प्राथमिक आरोग्य केंद्रात रात्री-अपरात्री गरोदर माता, अत्यवस्थ रुग्ण नेहमीच येतात. परंतु रुग्णवाहिकेअभावी त्यांना शहरातील रुग्णालयात जाण्यासाठी अनेकदा खासगी वाहनधारकांना विनवणी करावी लागते. तरीही वाहन वेळेवर उपलब्ध होत नाही. त्यामुळे रुग्णांच्या जिवावर बेतण्याची वेळ येते. याबाबत वैद्यकीय अधिकाऱ्यांना विचारले असता, त्यांनी रुग्णवाहिकेसाठी जिल्हा प्रशासनाकडे पाठपुरावा सुरू अल्याचे सांगितले. रुग्णांचे प्राण जाण्यापूर्वी प्रशासनाने विडूळ केंद्रास रुग्णवाहिका उपलब्ध करून द्यावी, अन्यथा आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल, असा इशारा नागरिकांनी दिला आहे.
050721\screenshot_2021_0704_192426.png
विडुळ पी एच सी ची रुग्णवाहिका दे धक्का..