पुसदमध्ये वाढला उन्हाचा पारा

By admin | Published: March 27, 2016 02:22 AM2016-03-27T02:22:53+5:302016-03-27T02:22:53+5:30

पहाटे धुके, दिवसभर उन्हाचा कडाका तर रात्री पुन्हा थंडगार हवा अशा बदलत्या वातावरणामुळे पुसदकर हैराण झाले आहे.

Pusha grew in hot summer | पुसदमध्ये वाढला उन्हाचा पारा

पुसदमध्ये वाढला उन्हाचा पारा

Next

हिट स्ट्रोक : प्रचंड गर्मी आणि कमालीची थंडी असे विचित्र हवामान
पुसद : पहाटे धुके, दिवसभर उन्हाचा कडाका तर रात्री पुन्हा थंडगार हवा अशा बदलत्या वातावरणामुळे पुसदकर हैराण झाले आहे. गेल्या १५ दिवसांपासून उन्हाची तीव्रता जाणवत असून दिवसाचे तापमान ४० डिग्री सेल्सीअसवर गेलेले आहे. वैद्यकीय क्षेत्रातील जाणकाराच्या मते शहरात सध्या हिट स्ट्रोक सुरू आहे. दिवसेंदिवस वाढत असलेल्या तापमानामुळे उष्माघाताची शक्यता असून काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
गेल्या १५ दिवसांपासून तापमानात सातत्याने वाढ होत आहे. तापमानाच्या पाऱ्याने ४० शी गाठली आहे. मे महिना अद्याप लांब आहे. मार्च महिन्यातच पुसद शहरात तापमान ४० अंशावर पोहोचले आहे. प्रचंड उष्मेने नागरिक हैराण झाले आहे. उन्हाच्या तडाख्यापासून वाचण्यासाठी नागरिक शीतपेयांचा मोठ्या प्रमाणावर वापर करीत आहे. त्यामुळे थंडगार लिंबू शरबत, आईस्क्रीम, ज्युस, कुल्फी यांच्या विक्रीमध्ये वाढ झाली आहे. आईस्क्रीम पार्लर ते रस्त्यावरच्या गाड्यांवरही नागरिकांची गर्दी दिसून येत आहे.
सध्या हिट स्ट्रोक व डिहायड्रेशन फिवर सुरू आहे. इन्फेक्शन नसले तरी मुलांना १०० ते १०३ डिग्री सेल्सीअस ताप येत आहे. उन्हात खेळल्यामुळे घाम येऊन अंगातील पाणी कमी होते. शक्यतो उन्हात खेळणे किंवा घराबाहेर पडणे टाळावे, मुलांनी भरपूर पाणी पिण्याची आवश्यकता आहे, असे मत बाल रोगतज्ज्ञ डॉ. भानुप्रकाश कदम यांनी व्यक्त केले आहे. कडक उष्मा असल्याने शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होते. त्याच प्रमाणे शरीराचे तापमान वाढते, त्याचे शरीरावर वाईट परिणाम होतात. त्यामुळे लहान मुले व वयोवृद्ध यांच्या बरोबरच डायबिटीज, दमा, हृदयाचे आजार असलेल्या रुग्णांनी अधिक काळजी घेण्याची आवश्यकता आहे, असे डॉ. राजेंद्र जाजू म्हणाले. (लोकमत चमू)

रस्त्यांवर शुकशुकाट
मार्च महिन्याच्या सुरुवातीला अवकाळी पाऊस व गारपिटीने तापमान घटले होते. मात्र आता दिवसेंदिवस तापमानाचा पारा वाढत आहे. त्यामुळे दिवसभर पुसद शहरातील रस्त्यांवर शुकशुकाट पहायला मिळत आहे. नागरिकांनी पांढरे शेले, रुमाल, काळा चष्मा परिधान केल्याचे दिसत आहे. २४ व २५ मार्च रोजी पुसद तालुक्यात ३८ अंश सेल्सीअस असलेले तापमान आता ४० अंशांवर पोहोचले आहे. परंतु येथे अधिकृत तापमानी नसल्याने तापमानाची नेमकी नोेंद होत नाही. उपविभागीय अधिकारी नितीनकुमार हिंगोले, तहसीलदार डॉ. संजय गरकल हे तापमापीची सोय करतील, अशी अपेक्षा आहे.

Web Title: Pusha grew in hot summer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.