बाणगाव प्रकल्पाच्या कामावर प्रश्नचिन्ह

By admin | Published: July 3, 2017 02:07 AM2017-07-03T02:07:48+5:302017-07-03T02:07:48+5:30

येथील लघु प्रकल्पाची केवळ भिंत बांधून धरणाचे सोपस्कार पार पाडल्याचे भासविले जात आहे.

Question mark on the work of the Banagara project | बाणगाव प्रकल्पाच्या कामावर प्रश्नचिन्ह

बाणगाव प्रकल्पाच्या कामावर प्रश्नचिन्ह

Next

नागरिकात भीती : कामात हलगर्जीपणाचा अभियंत्यावर आरोप
नीलेश राठोड ।
लोकमत न्यूज नेटवर्क
बाणगाव : येथील लघु प्रकल्पाची केवळ भिंत बांधून धरणाचे सोपस्कार पार पाडल्याचे भासविले जात आहे. धरणात गेलेली जमीन जैसे थे असताना पाणी साठवणूक होणार अशी, असा प्रश्न जानकार नागरिकांना पडला आहे. त्यामुळे या लघु प्रकल्पावर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याचे चित्र आहे.
बाणगाव परिसरात पाण्याची नेहमीच टंचाई भासत असल्याने या परिसरात धरणाची संकल्पना आणली. त्यानुसार जमिनीची लेव्हल तपासण्याचे काम अभियंत्यांच्या मदतीने करण्यात आले. हे काम जवळपास दहा वर्षांपासून सुरू होते. येथे दोन टीएमसी पाणीसाठवण क्षमतेचे धरण निर्मितीचे काम सुरू झाले. संबंधित शेतकऱ्यांच्या जमिनीही अधिग्रहित करण्यात आल्या. आज तारखेला या धरणाच्या भिंतीचे काम पूर्णत्वास गेले असल्याचे सांगितले जाते. मात्र काही चिकित्सक लोकांनी पाहणी केली असता धरणात व्यापलेली जमीन जैसे थेच असल्याचे दिसून आले. त्यामुळे धरण म्हटल्यास त्याचे काही निकष येथे पूर्ण झाले काय, हे पाहणी अंती संबंधित शाखा अभियंत्यांना याबाबत विचारले असता सपाटीकरणावर ते निरूत्तर राहिले. त्यामुळे या धरणाचे काम एकंदरित निकृष्ट झाल्याचे उघड होत आहे.
धरणाचे काम अगदी काटेकोर असणे अनिवार्य आहे. कारण त्यातील थोडीही चूक हजारो नागरिकांच्या जीवावर बेतू शकते. त्यामुळे सपाटीकरणाचे काम काटेकोर होणे गरजेचे आहे. येथे बांधण्यात आलेल्या धरणासाठी अधिग्रहित केलेली जमीन अगदी पूर्वी होती तशीच आहे. अनेक झाडे कायम आहे. पठारी भाग एक समान करण्यात आलेला नाही. त्यामुळे या धरणाची साठवण क्षमता दोन टीएमसी कशी राहील, हाही प्रश्नच आहे. पावसाळा सुरू झाल्यानंतर जमीन सपाटीचे काम होणे नाही. जमा झालेले पाणी साठवण क्षमतेपेक्षा अधिक झाल्यास गावात शिरण्याची भीती निर्माण झाली आहे.

Web Title: Question mark on the work of the Banagara project

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.