संघटित झाल्याशिवाय प्रश्न सुटत नाही

By admin | Published: January 21, 2017 01:31 AM2017-01-21T01:31:01+5:302017-01-21T01:31:01+5:30

शासन संख्याबळाला घाबरते. त्यामुळे सामाजिक प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी समाज संघटित असणे आवश्यक आहे.

The question remains unresolved without getting involved | संघटित झाल्याशिवाय प्रश्न सुटत नाही

संघटित झाल्याशिवाय प्रश्न सुटत नाही

Next

रावसाहेब दानवे : पुसद येथे विदर्भस्तरीय सोनार संमेलन
पुसद : शासन संख्याबळाला घाबरते. त्यामुळे सामाजिक प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी समाज संघटित असणे आवश्यक आहे. अल्पावधीतच सोनार समाजाच्या सर्व शाखा संघटित झाल्या असून देशात ५५ लाख सोनार समाज आहे. समाजाने शासन दरबारी ज्या मागण्या मांडल्या आहे, त्या भाजपा सरकार पूर्ण करेल, अशी ग्वाही भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी येथे दिले.
आॅल इंडिया सोनार फेडरेशनच्यावतीने कांचनदास भगवंत वाढोणकर स्मृती सोनार जोडो अभियानांतर्गत पुसद येथे आयोजित सोनार समाज महासंमेलनात गुरुवारी ते बोलत होते. येथील गणेश मंगल कार्यालयात आयोजित सर्व शाखीय सोनार समाजाच्या या महासंमेलनाला पालकमंत्री मदन येरावार, फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष मोहन हिवरकर, भाजपाचे अ‍ॅड.नीलय नाईक, भाजपा जिल्हाध्यक्ष राजेंद्र डांगे, आशीष वाढोणकर उपस्थित होते. सर्वप्रथम समाजाचे आराध्य दैवत नरहरी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर सोनार समाजाच्यावतीने रावसाहेब दानवे, पालकमंत्री मदन येरावार, राष्ट्रीय अध्यक्ष मोहन हिवरकर यांचा आशीष वाढोणकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच समाजातील ज्येष्ठ बांधवांचा सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक डॉ.देवेंद्र शेरेकर यांनी केले. यशस्वीतेसाठी दिलीप महतकर, नारायण शेरेकर, गिरीष वाढोणकर, विलास अनासरे, सुभाष वेदपाठक, नामदेव सुवर्णकार, पारस देवपूरकर, राजेश पंडित आदींचे सहकार्य लाभले. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: The question remains unresolved without getting involved

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.