सेवानिवृत्त पोलिसांचे प्रश्न पालकमंत्र्यांच्या दरबारात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2018 10:13 PM2018-01-02T22:13:58+5:302018-01-02T22:14:09+5:30
सेवानिवृत्त पोलीस अधिकारी आणि कर्मचाºयांचे विविध प्रश्न पालकमंत्री मदन येरावार यांच्याकडे निवेदनाद्वारे मांडण्यात आले. यात प्रामुख्याने सहाव्या वेतन आयोगातील तफावत आणि सातव्या वेतन आयोगात दुरुस्तीचा प्रश्न मांडण्यात आला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : सेवानिवृत्त पोलीस अधिकारी आणि कर्मचाºयांचे विविध प्रश्न पालकमंत्री मदन येरावार यांच्याकडे निवेदनाद्वारे मांडण्यात आले. यात प्रामुख्याने सहाव्या वेतन आयोगातील तफावत आणि सातव्या वेतन आयोगात दुरुस्तीचा प्रश्न मांडण्यात आला आहे.
पोलीस अधिकारी आणि कर्मचारी २४ तास सेवा देतात. ड्यूटीवर असताना त्यांना लोकांकडून चांगल्या कामाची पावती न देता मारहाण केली जाते. पोलिसांसाठी मानवाधिकार आयोग असावा, पोलीस विभागात काम करताना वीरमरण आल्यास सेवेचा कोणताही लाभ दिला जात नाही. उलट अडवणुकीचे धोरण राबविले जाते. संरक्षण खात्याप्रमाणे लाभ मिळावे, अनुकंपा तत्त्वावर जास्तीत जास्त पोलिसांच्या पाल्यांना नोकºया देण्यात याव्या, सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचाºयांच्या मुलांना नोकरीत तीन ऐवजी पाच टक्के आरक्षण देण्यात यावे. सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचाºयांना कोल्हापूर येथे आरोग्यसेवेबाबत मुख्यमंत्र्यांनी केलेल्या घोषणेची अंमलबजावणी व्हावी आदी मागण्या या निवेदनात नमूद करण्यात आल्या आहे. सेवानिवृत्त पोलीस अधिकाºयांचे प्रश्न निकाली काढण्यासाठी प्रयत्न केले जाईल, असे पालकमंत्र्यांनी शिष्टमंडळाला सांगितले.
निवेदन देताना महाराष्ट्र पोलीस सेवानिवृत्त अधिकारी कल्याणकारी असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष गुलाबराव पंधरे, जिल्हा महासचिव दयानंद बन्सोड, सचिव पांडुरंग शेलारे, उपाध्यक्ष गणेश शेरे, अरुण शुंकर, सहसचिव प्रल्हाद गवळी, पर्यवेक्षक गजानन गिरी, कार्याध्यक्ष गणपत गिनगुले आदी उपस्थित होते.