खचलेल्या विहिरींचा प्रश्न जिल्हा परिषदेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2019 09:47 PM2019-01-14T21:47:10+5:302019-01-14T21:47:38+5:30
जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात विहिरी खचल्या होत्या. यातील विहिरींची दुरुस्ती अद्यापही झाली नसल्याने खासदार भावनाताई गवळी यांच्या नेतृत्वात शिवसेना पदाधिकाऱ्यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जलज शर्मा यांची भेट घेतली. खचलेल्या विहिरी तातडीने दुरुस्त करण्याची सूचना याप्रसंगी खासदारांनी दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात विहिरी खचल्या होत्या. यातील विहिरींची दुरुस्ती अद्यापही झाली नसल्याने खासदार भावनाताई गवळी यांच्या नेतृत्वात शिवसेना पदाधिकाऱ्यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जलज शर्मा यांची भेट घेतली. खचलेल्या विहिरी तातडीने दुरुस्त करण्याची सूचना याप्रसंगी खासदारांनी दिली.
सन २०१२-१३ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात १५ हजार ५०८ शेतकऱ्यांच्या विहिरी खचल्याबाबत शासनाकडे निवेदन प्राप्त झाले होते. सर्वेक्षणात यातील पाच हजार १६८ विहिरी दुरुस्तीसाठी पात्र ठरल्या. प्रशासकीय मान्यतेचे अधिकार गटविकास अधिकाऱ्यांकडे होते. यादरम्यान १८७२ विहिरींची दुरुस्ती करण्यात आली. आता प्रशासकीय मान्यता देण्याचे अधिकार जिल्हा परीषद मुख्य कार्यकारी अधिकाºयांकडे देण्यात आले आहे. मात्र मुदत ३० जून २०१८ रोजी संपल्याने विहिर दुरुस्तीचे काम थंडबस्त्यात पडले आहे. खासदार भावनाताई गवळी यांनी सीईओ जलज शर्मा यांची भेट घेऊन शेतकºयांच्या खचलेल्या विहिरी तातडीने दुरुस्ती करण्याच्या सूचना दिल्या.
यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख राजेन्द्र गायकवाड, उपजिल्हाप्रमुख किशोर इंगळे, तालुका प्रमुख संजय रंगे, शहर प्रमुख पिंटु बांगर, पंचायत समिती चे सभापती एकनाथ तुमकर, उपसभापती गजानन पाटील, पंचायत समिती सदस्य कांता संजय कांबळे, नंदा ज्ञानेश्वर लडके, युवासेनेचे उपजिल्हाप्रमुख सचिन चव्हाण आदी उपस्थित होते.