खासदारांनी जाणले शेतकऱ्यांचे प्रश्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2017 10:14 PM2017-11-18T22:14:47+5:302017-11-18T22:15:04+5:30

गुलाबी बोंडअळीमुळे हैराण झालेल्या मांगलादेवीतील शेतकऱ्यांचे प्रश्न शनिवारी खासदार भावना गवळी यांनी जाणून घेतले.

The questions of the farmers that the MPs knew | खासदारांनी जाणले शेतकऱ्यांचे प्रश्न

खासदारांनी जाणले शेतकऱ्यांचे प्रश्न

Next
ठळक मुद्देमांगलादेवीला भेट : प्रसंगी रस्त्यावर उतरण्याची दाखविली तयारी

आॅनलाईन लोकमत
मांगलादेवी : गुलाबी बोंडअळीमुळे हैराण झालेल्या मांगलादेवीतील शेतकऱ्यांचे प्रश्न शनिवारी खासदार भावना गवळी यांनी जाणून घेतले. शेतकऱ्यांच्या मदतीसाठी प्रसंगी आंदोलन केले जाईल असे त्यांनी यावेळी सांगितले.
येथील शेतकरी श्याम मुरलीधर उघडे यांच्या शेताची पाहणी खासदार भावना गवळी यांनी केली. बोंडअळीमुळे झालेल्या नुकसानीची चौकशी त्यांनी केली. या अळीच्या नियंत्रणासाठी कृषी विभागाकडून योग्य मार्गदर्शनाची गरज आणि झालेल्या नुकसानीची भरपाई मिळावी अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली. शेतकºयांवरील अन्याय सहन केला जाणार नाही. प्रसंगी रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागेल असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. प्रसंगी नेर पालिकेचे नगर उपाध्यक्ष पवन जयस्वाल, स्रेहल भाकरे, रवीपाल गंधे, रामभाऊ दहापूते आदी उपस्थित होते.

Web Title: The questions of the farmers that the MPs knew

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.