ज्येष्ठांचे प्रश्न मुख्यमंत्र्यांच्या दरबारात

By admin | Published: August 13, 2016 01:26 AM2016-08-13T01:26:04+5:302016-08-13T01:26:04+5:30

जिल्ह्यातील ज्येष्ठ नागरिकांचे विविध प्रश्न निकाली काढावे या मागणीसाठी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठविण्यात आले आहे.

The questions of the senior leaders in the Chief Minister's courtroom | ज्येष्ठांचे प्रश्न मुख्यमंत्र्यांच्या दरबारात

ज्येष्ठांचे प्रश्न मुख्यमंत्र्यांच्या दरबारात

Next

जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : विदर्भ प्रदेश विकास परिषदेचा पुढाकार
यवतमाळ : जिल्ह्यातील ज्येष्ठ नागरिकांचे विविध प्रश्न निकाली काढावे या मागणीसाठी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठविण्यात आले आहे. विदर्भ प्रदेश विकास परिषद यवतमाळ जिल्ह्याच्यावतीने निवेदन सादर केले आहे.
राज्याने जाहीर केलेले ज्येष्ठ नागरिक धोरण काही महत्वाचे बदल करून त्वरित अमलात आणावे, ज्येष्ठ नागरिकांची वयोमर्यादा ६५ वरून ६० करावी, श्रावणबाळ, वार्धक्यनिवृत्ती वेतनात राज्य व केंद्र शासनाने वाढ करावी, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्ध निवृत्ती वेतन योजना, संजय गांधी निराधार योजना आदींमध्ये महागाईच्या निर्देशांकाप्रमाणे वाढ करावी, ज्येष्ठ नागरिक विमा योजना शासनातर्फे लागू करण्यात यावी, ज्येष्ठांसाठी स्वतंत्र विभाग (खाते) सुरू करावा, या खात्यासाठी स्वतंत्र मंत्री द्यावा आदी मागण्या या निवेदनात नमूद करण्यात आल्या आहेत.
जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देताना विदर्भ प्रदेश विकास परिषदेचे जिल्हाध्यक्ष विजय घाडगे, डॉ. रवींद्र कोटेचा, राजकुमार पत्रे, डॉ. जीवन ठाकरे, राजेश मांडवकर, ओमप्रकाश चांदूरकर, अशोक उम्रतकर, मोहन होकम, जिल्हा सरचिटणीस बसवेश्वर माहुरकर, साहेबराव वानखडे, अ. खालीद खतीब यांच्यासह विदर्भ प्रदेश विकास परिषदेचे पदाधिकारी, सदस्य आदी उपस्थित होते. (वार्ताहर)

Web Title: The questions of the senior leaders in the Chief Minister's courtroom

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.