रबी ५० हजार हेक्टरने घटणार

By admin | Published: October 30, 2014 10:57 PM2014-10-30T22:57:35+5:302014-10-30T22:57:35+5:30

निसर्गाचा लहरीपणा, वातावरणातील बदल, वीज संकट आणि खरिपाने दिलेला दगा आदी कारणांनी जिल्ह्यातील रबीचे क्षेत्र यंदा तब्बल ५० ते ६० हजार हेक्टरने घटण्याची शक्यता आहे. प्रकल्पात पुरेसे पाणी

Rabi will decrease by 50 thousand hectare | रबी ५० हजार हेक्टरने घटणार

रबी ५० हजार हेक्टरने घटणार

Next

शेतकरी धास्तावले : थंडीचाही पत्ता नाही, वीज संकट कायम
ज्ञानेश्वर मुंदे - यवतमाळ
निसर्गाचा लहरीपणा, वातावरणातील बदल, वीज संकट आणि खरिपाने दिलेला दगा आदी कारणांनी जिल्ह्यातील रबीचे क्षेत्र यंदा तब्बल ५० ते ६० हजार हेक्टरने घटण्याची शक्यता आहे. प्रकल्पात पुरेसे पाणी असले तरी कालवे नादुरुस्त असल्याने सिंचनातही अडसर येणार आहे. परिणामी अनेक शेतकऱ्यांनी रबी लागवड करताना हात आखडता घेण्याचा निर्णय घेतला आहे.
निसर्गाच्या लहरीपणाचा यंदा शेतकऱ्यांना जबर तडाखा बसला. अपुऱ्या पावसाने खरीप हातचा गेला. सोयाबीनच्या ३० किलो बॅगला ८० किलोचा उतारा येत आहे. मजुरीही यातून निघत नाही. कापसाचीही अशीच अवस्था आहे. एकरी आठ ते दहा हजार रुपये खर्च करूनही निम्मे पैसे निघण्याची शक्यता नाही. दोनही नगदी पीक हातचे गेल्याने शेतकरी धास्तावला आहे. अशातच रबी हंगामाला प्रारंभ होत आहे. मात्र शेतकरी रबी हंगामाच्या मन:स्थितीत दिसत नाही. परिणामी जिल्ह्याच्या रबी हंगामाच्या क्षेत्रात प्रचंड घट येण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात गहू, हरभरा यासह सूर्यफुल आदी पिके रबी हंगामात घेतली जातात.
कृषी विभागाने रबी हंगामाचे नियोजन केले असून यंदा एक लाख २६ हजार ८०४ हेक्टरवर रबीची पेरणी होणे अपेक्षित आहे. त्यात ८४ हजार ९९२ हेक्टर हरभरा आणि ३९ हजार २९२ हेक्टर गहू व इतर पिकांचा समावेश आहे. विशेष म्हणजे गतवर्षी जिल्ह्यात एक लाख ८० हजार ५७० हेक्टरवर रबीची पेरणी झाली होती. त्यात हरभऱ्याचे क्षेत्र एक लाख ४० हजार ५६७ हेक्टर होते. तर गहू ३४ हजार ४९९ हेक्टरवर पेरण्यात आला होता. यंदा गतवर्षीच्या हरभरा क्षेत्रापेक्षाही कमी क्षेत्रावर गहू-हरभराची लागवड होणार असल्याचे कृषी विभागाच्या नियोजनावरून दिसत आहे. तब्बल ५३ हजार ७६६ हेक्टर गतवर्षी पेक्षा यंदा रबीचे कमी क्षेत्र राहणार आहे.
रबीच्या क्षेत्रात घट येण्यामागे अनेक कारणे आहेत. त्यातील महत्वाचे कारण म्हणजे वीज भारनियमन होय. पुरेसे पाणी असतानाही खरिपातच शेतकऱ्यांंना सिंचन करता आले नाही. दोन ते तीन तास वीज मिळत असल्याने ओलित करणे अशक्य होते. हीच स्थिती रबी हंगामातही राहण्याची शक्यता असून उभे पीक डोळ्याने वाळताना पाहण्यापेक्षा पेरणीच न केलेली बरी, असा अनेक शेतकऱ्यांचा सध्या तरी सूर दिसत आहे. गतवर्षी झालेल्या गारपिटीनेही शेतकरी यावर्षी पेरणीसाठी पुढे येताना दिसत नाही. ऐन हरभरा काढण्याच्यावेळी प्रचंड गारपीट झाली. गहू, हरभरा पीक उद्ध्वस्त झाले. यंदाही निसर्गाचा लहरीपणा दिसत आहे. ऐन सोयाबीन काढणीच्या वेळी ढगाळ वातावरण निर्माण झाले. त्यामुळे अनेकांची पाचावर धारण बसली होती. या सर्व बाबींचा परिणाम रबी हंगामाच्या क्षेत्रावर होत आहे.

Web Title: Rabi will decrease by 50 thousand hectare

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.