यवतमाळमध्ये जुगार अड्ड्यावर छापा; महिलेसह १७ जणांना अटक, ४ लाखांचा मुद्देमाल जप्त
By सुरेंद्र राऊत | Published: September 6, 2022 03:11 PM2022-09-06T15:11:16+5:302022-09-06T15:14:58+5:30
अवधूतवाडी पोलिसांची कारवाई
यवतमाळ : शहरात विविध भागात मोठ्या प्रमाणात जुगार अड्डे सुरू आहेत. अवधूतवाडी पोलिसांनी आर्णी मार्गावरील पल्लवी लॉनमागे सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा टाकला. येथे जुगार खेळताना महिलेसह १७ जणांना अटक करण्यात आली. ही कारवाई मंगळवारी पहाटे ३ वाजता केली.
आशिष भाऊराव आत्राम (२९) याने पाण्याच्या टाकीजवळ असलेल्या घरी जुगार अड्डा भरविला होता. तेथे पुरुषच नाही तर महिलाही जुगार खेळण्यासाठी येत होत्या. पोलिसांनी गोपनीय पाळत ठेवून जुगाऱ्यांना रंगेहात पकडण्याची योजना आखली. पहाटे ३ च्या सुमारास पोलिसांनी छापा टाकला. डावावर लावलेले १ लाख ५२ हजार १४० रुपये रोख जप्त केले.
त्यानंतर आरोपी मीना रामकृष्ण नेमाडे (३४) रा. देवीनगर लोहारा, हनीफ सत्तार गोरी (५०) रा. उमरसरा, शेख हकीम शेख करीम (४०) रा. इस्लामपूरा, अजय विश्वंभर खडसे (१८) रा. पापळ जि. अमरावती, दिशाद युसुफ खान पठाण (३०) रा. मोठे वडगाव, मिलिंद हेमराज मोहाडे (३२) रा. दांडेकर ले-आऊट, विजय मधुकर मसराम (४२) रा. उमरसरा, पंकज विष्णू राऊत (३०) रा. वडगाव, आशिष सूर्यकांत कुरडकर (३५) रा. उमरसरा, जसवंत हसमुख चोटाई (२४) रा. संकटमोचन, अजय दत्तराव राठोड (४०) रा. तुळजानगरी, श्याम रमाकांत शर्मा (४०) रा. धनश्री नगर, मोहन संतोष टेंभरे (३०) रा. दांडेकर ले-आऊट, उल्हास रत्नाकर वैद्य (५७) रा. अंजनेय सोसायटी, अमित अशोक देशमुख (३२) रा. संभाजीनगर, प्रतीक सुनील लंगोटे (२५) रा. मोठे वडगाव यांना अटक केली. घटनास्थळावरून पोलिसांनी ७८ हजार रुपये किमतीचे मोबाईल, दुचाकी असा दोन लाख दोन हजारांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक नागेश खाडे यांच्यासह पथकाने केली.