विदर्भाच्या वीज कर्मचाऱ्यांना रायगडाची हाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2020 07:47 PM2020-06-16T19:47:37+5:302020-06-16T19:49:54+5:30

३ जून रोजी महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर निसर्ग चक्रीवादळाने धडक दिली. त्यात रायगड जिल्ह्यात अतोनात नुकसान झाले. रायगडाचे जनजीवन पूर्वपदावर आणण्यासाठी विदर्भातील वीज कर्मचाऱ्यांची अतिरिक्त कुमक बोलाविली गेली.

Raigad's call to Vidarbha power workers | विदर्भाच्या वीज कर्मचाऱ्यांना रायगडाची हाक

विदर्भाच्या वीज कर्मचाऱ्यांना रायगडाची हाक

Next
ठळक मुद्दे३५८ जण तातडीने रवाना निसर्ग चक्रीवादळानंतर युद्धपातळीवर दुरुस्ती सुरू

अविनाश साबापुरे।
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : निसर्ग चक्रीवादळाच्या धुमाकुळाने निसर्गसंपन्न रायगड जिल्ह्यात पायाभूत सुविधांची दाणादाण उडाली. पंधरवाडा लोटूनही महावितरणचे उद्ध्वस्त झालेले जाळे दुरुस्त होऊ शकलेले नाही. अखेर रायगडाचे जनजीवन पूर्वपदावर आणण्यासाठी विदर्भातील वीज कर्मचाऱ्यांची अतिरिक्त कुमक बोलाविली गेली.
रायगडाची हाक येताच तब्बल ३५८ वीज कर्मचारी, अधिकारी प्रतिनियुक्तीवर गेले. स्वजिल्ह्यात पावसाळी वातावरणामुळे दुरुस्तीची कामे प्रलंबित असताना आणि राज्यात कोरोनाचे भीतीदायक वातावरण असतानाही हे कर्मचारी मंगळवारीच रवाना झाले.
३ जून रोजी महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर निसर्ग चक्रीवादळाने धडक दिली. त्यात रायगड जिल्ह्यात अतोनात नुकसान झाले. विशेषत: वीज महावितरणची संपूर्ण यंत्रणा जमीनदोस्त झाली. त्यामुळे १५ दिवसांपासून तेथील वीज पुरवठा ठप्प आहे. पिण्याचे पाणी व इतर समस्यांना नागरिकांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे महावितरणची नेटवर्कची युद्धपातळीवर दुरुस्ती करण्यासाठी महावितरण संचालकांनी (संचालन) महाराष्ट्रातून अतिरिक्त कर्मचारी तातडीने रायगडात प्रतिनियुक्तीवर पाचारण केले. विशेष म्हणजे सोमवारी हे आदेश धडकताच मंगळवारी सकाळीच ३५८ कर्मचारी रायगडकडे रवाना झाले. यात नाशिक व औरंगाबाद मंडळातील कर्मचाऱ्यांचाही नगण्य समावेश असला तरी तब्बल सव्वादोनशे कर्मचारी विदर्भातील आहेत.
यात यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा विभागातून सहायक अभियंत्यासह आठ कर्मचारी, पुसद विभागातून उपकार्यकारी अभियंत्यासह नऊ तर यवतमाळ विभागातून उपकार्यकारी अभियंत्यासह ११ जण रायगड जिल्ह्यात प्रतिनियुक्तीवर गेले आहे.

Web Title: Raigad's call to Vidarbha power workers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :electricityवीज