पुसदच्या ३० गावांतून रेल्वे ट्रॅक

By admin | Published: July 12, 2017 01:07 AM2017-07-12T01:07:04+5:302017-07-12T01:07:04+5:30

शेतकरी आत्महत्याग्रस्त यवतमाळ जिल्ह्याच्या विकासात मैलाचा दगड ठरणाऱ्या वर्धा-यवतमाळ-नांदेड हा रेल्वे प्रकल्प

Railway tracks from 30 villages of Pusad | पुसदच्या ३० गावांतून रेल्वे ट्रॅक

पुसदच्या ३० गावांतून रेल्वे ट्रॅक

Next

उपविभाग : वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वे, भूसंपादनाचा १४ जुलैपासून मोबदला
प्रकाश लामणे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
पुसद : शेतकरी आत्महत्याग्रस्त यवतमाळ जिल्ह्याच्या विकासात मैलाचा दगड ठरणाऱ्या वर्धा-यवतमाळ-नांदेड हा रेल्वे प्रकल्प पुसद उपविभागातील ३० गावांमधून जाणार आहे. त्यासाठी ४३७.७७ हेक्टर आर. जमिनीचे अधिग्रहण करण्यात आले असून, येत्या १४ जुलैपासून मोबदला वाटपास सुरूवात होणार असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी नितीनकुमार हिंगोले यांनी दिली.
लोकमतच्या एडिटोरीयल बोर्डचे चेअरमन माजी खासदार विजय दर्डा यांच्या परिश्रमातून वर्धा-यवतमाळ-नांदेड हा रेल्वे प्रकल्प साकारला जात आहे. २७० किलोमीटर लांबीच्या या प्रकल्पाला २००७ साली मान्यता मिळाली होती. यवतमाळ येथे तत्कालिन रेल्वे मंत्री लालूप्रसाद यादव यांच्या हस्ते २००९ मध्ये या रेल्वे प्रकल्पाचे भूमिपूजन करण्यात आले होते. केंद्राचा ६० टक्के तर राज्याचा ४० टक्के वाटा या प्रकल्पात आहे. महत्वाकांक्षी रेल्वे प्रकल्पांतर्गत यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस आणि पुसद तालुक्यातील सर्वाधिक ३० गावांमधून हा रेल्वे प्रकल्प जाणार आहे. एक हजार ४६७ शेतकऱ्यांची ४३७.७७ हेक्टर आर. जमीन अधिग्रहित करण्यात येत आहे. पुसद उपविभागात रेल्वेची लांबी ५८.३१ किलोमीटर आहे. येत्या आॅगस्टपर्यंत यावर सुनावनी पूर्ण होईल तर चार गावातील जमिनींचा प्रारूप निवाडा तयार करून जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आला. एका गावातील जमिनीचे सिमांकन झाले नसल्याने संयुक्त मोजणीसाठी प्रलंबित आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी दोन गावच्या प्रारूप निवाड्यास मंजूरी दिली असल्याने तेथील शेतकऱ्यांना त्यांच्या अधिग्रहित जमिनीचा मोबदला येत्या आठ दिवसात दिला जाणार असल्याचे रेल्वे भूसंपादन अधिकारी तथा पुसदचे उपविभागीय अधिकारी नितीनकुमार हिंगोले यांनी सांगितले.
या महत्वाकांक्षी रेल्वे प्रकल्पामुळे वर्धा आणि नांदेड ही दोन शहरे जोडली जाणार असल्याने यवतमाळ जिल्ह्याच्या विकासाला गती
मिळणार आहे.

अशी आहेत रेल्वेमार्गात येणारी गावे $$्रिपुसद तालुक्यातील भूसंपादन होणाऱ्या गावांमधून पुसद खंड -२, बेलगव्हाण, कोप्रा बु., चिलवाडी, मोहा ई., लोणी, हर्षी, खर्षी, बिबी, शेलू बु., ज्योतीनगर, कृष्णनगर, वरवट, शिवानगर, शिळोणा, बाळवाडी, वेणी खु. आदी १७ गावे तर दिग्रस तालुक्यातील भूसंपादन होणाऱ्या गावांमध्ये साखरा, नांदगव्हाण, दोनद, दिग्रस, गांधीनगर, सिंगद, वसंतपूर, सेवानगर, रुई तलाव, काटी, रामनगर, ईसापूर, हरसूल आदी १३ गावांचा समावेश आहे. एकूण ३० गावांपैकी २३ गावांमध्ये भूसंपादन सुनावनीसाठी शेतकऱ्यांना नोटीस बजावण्यात आल्या आहेत.

 

Web Title: Railway tracks from 30 villages of Pusad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.