कपाशी, सोयाबीन पिकावर पावसाचे ढग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2017 09:53 PM2017-10-21T21:53:08+5:302017-10-21T21:53:20+5:30

मोठ्या कष्टानं रानात पिकविलेला कापूस व सोयाबीनचे पीक हाती येण्याच्या अवस्थेत असताना गेल्या दोन दिवसांपासून वणी उपविभागात पावसाळी वातावरण तयार झाले आहे.

Rain clouds on cotton, soybean crops | कपाशी, सोयाबीन पिकावर पावसाचे ढग

कपाशी, सोयाबीन पिकावर पावसाचे ढग

Next
ठळक मुद्देशेतकºयांच्या उरात धडकी : हाती येणारे पीक वाचविण्यासाठी धडपड

लोकमत न्यूज नेटवर्क
वणी : मोठ्या कष्टानं रानात पिकविलेला कापूस व सोयाबीनचे पीक हाती येण्याच्या अवस्थेत असताना गेल्या दोन दिवसांपासून वणी उपविभागात पावसाळी वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे शेतकºयांच्या उरात धडकी भरली आहे. कापूस वेचाई व सोयाबीन कापणीसाठी मजुरच मिळेनासे झाल्याने ७५ टक्के पीक अद्यापही शेतातच उभे आहे. त्यात निसर्गाच्या प्रकोपाची शक्यता निर्माण झाल्याने हे पीक वाचविण्यासाठी शेतकºयांची धडपड सुरू आहे.
शुक्रवारी पांढरकवडा परिसरात पावसाने हजेरी लावली, तर शनिवारी वणी व झरी परिसरात आभाळ दाटून आले होते. दुपारच्या सुमारास झरी तालुक्यात मेघगर्जना सुरू होती. पावसाच्या शक्यतेने शेतकºयांची चांगलीच तारांबळ उडाली. या परिसरातील शेतांमध्ये अजूनही ४० ते ५० क्विंटल कापूस शेतात आहे. त्यात मजुरांची वाणवा असल्याने शेतकºयांपुढे मोठे संकट उभे ठाकले आहे. मजुराअभावी कापूस वेचणीला विलंब होत आहे. सोयाबीनचीही तिच अवस्था आहे. सोयाबीनच्या शेंगा भरल्याने ज्यांना जमले त्यांनी सोयाबीनची कापणी केली. मात्र ज्यांना मजुरच मिळाले नाही, त्यांचे सोयाबीन अद्यापही कापणीच्या प्रतीक्षेत शेतात उभे आहे. त्यात आता ढगाळी वातावरण तयार झाल्याने पिकाला धोका निर्माण झाला आहे.
वणी, मारेगाव तालुक्यातही तिच स्थिती आहे. या भागातही कापूस व सोयाबीनचा पेरा मोठ्या प्रमाणावर आहे. अगोदर या पिकांवर अनेक रोगांच्या प्रादूर्भावाने शेतकरी वैतागला होता. त्यातून सावरतो न सावरतो, तोच आता अचानक पावसाळी वातावरण तयार झाल्याने या पिकांना फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. हवामान खात्याने २२ आॅक्टोबरपर्यंत विदर्भात वादळी पावसाची शक्यता वर्तविली आहे. तसे वातावरणही तयार झाले आहे. काही ठिकाणी तुरळक पावसाने हजेरी लावली. त्यामुळे पिकांना फटका बसला.
आंध्र, मराठवाड्यातून मजुरांची आयात, मजुरीचे दर भिडले गगनाला
४मजुरांच्या तुटवड्यामुळे शेतकरी हैराण आहेत. झरी, मारेगाव व वणी तालुक्यात तेलंगणा व मराठवाड्यातून मजुरांची आयात केली जात आहे. तेलंगणा व मराठवाड्यातील अनेक मजूर कामाच्या शोधात या भागात येत आहेत. रेल्वेने येणाºया या मजुरांची प्रतीक्षा करीत अनेक शेतकरी आपआपल्या परिसरातील रेल्व स्थानकावर थांबतात. तेथे आलेल्या मजुरांशी कामाबाबत सौदा केला जात आहे. सौदा झाल्यास हे मजूर शेतात कामासाठी येतात. मात्र सध्या दिवाळीचा सण असल्याने या मजुरांचे येणेदेखील थांबले आहे. त्यामुळे काही शेतकरी अदिलाबाद व मराठवाड्यात मजुरांच्या शोधात गेले आहेत.
पांढरकवडा तालुक्यातही पिकांचे नुकसान
पांढरकवडा : तालुक्यात गुरूवार व शुक्रवारी झालेल्या पावसाने सोयाबीन व कपाशी पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. पांढरकवडा तालुका हा सर्वाधिक कापूस पिकाविणारा तालुका म्हणून ओळखला जातो. त्याखालोखाल शेतकरी सोयाबीनचे उत्पन्न घेतात. सध्या कपाशी वेचणीचा व सोयाबीन काढणीचा हंगाम सुरू आहे. अनेक शेतकºयांनी आपल्या शेतातील सोयाबीन काढणे सुरू केले आहे. काहींनी सोयाबीनची कापणी करून शेतातच ढिग मारून ठेवले आहे. परंतु अचानक आलेल्या मुसळधार पावसाने सोयाबीन पिकाचे फारमोठे नुकसान झाले.हीच परिस्थिती कपाशी पिकाची झाली आहे. अनेक शेतकºयांच्या शेतात कापूस फुटलेला आहे. वेचणीची लगबग सुरू असतानाच अचानक आलेल्या पावसाने कापूस खराब झाला आहे. एवढेच नव्हे तर पºहाटीच्या झाडाला लागलेली मोठमोठी बोंडे गळून पडली आहेत.
 

Web Title: Rain clouds on cotton, soybean crops

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.