बियाण्यांविरुद्ध तक्रारींचा पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2020 05:00 AM2020-06-25T05:00:00+5:302020-06-25T05:00:22+5:30

३१ मे रोजी जिल्ह्यात पाऊस बरसला. सलग दोन दिवस पावसाने हजेरी लावली. ११, १२, १३ आणि १५ जूनला पाऊस बरसला. यानंतर पावसाने उघडीप दिली. यानंतर पेरणीच्या कामाला चांगलाच वेग आला. ७२ टक्के पेरण्या आटोपल्या. मात्र पेरणी केलेले सोयाबीनचे सर्टिफाईड बियाणे उगवलेच नाही. मात्र मोजक्याच शेतकऱ्यांनी याची तक्रार केली आहे.

Rain of complaints against seeds | बियाण्यांविरुद्ध तक्रारींचा पाऊस

बियाण्यांविरुद्ध तक्रारींचा पाऊस

Next
ठळक मुद्देसोयाबीनच्या ५४९ तक्रारी : दहा हजार हेक्टरवर दुबार पेरणीची वेळ

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : बोगस बियाणे आणि अपुरा पाऊस यामुळे शेतकऱ्यांनी पेरलेले बियाणे उगवलेच नाही. यामुळे जिल्ह्यातील दहा हजार हेक्टर क्षेत्राला दुबार पेरणी करावी लागणार आहे. बियाणे उगवलेच नाही याच्या ५४९ तक्रारी कृषी विभागाकडे आल्या आहेत. तक्रारीचा हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. उमरखेड तालुक्यातून सर्वाधिक तक्रारी आहेत.
३१ मे रोजी जिल्ह्यात पाऊस बरसला. सलग दोन दिवस पावसाने हजेरी लावली. ११, १२, १३ आणि १५ जूनला पाऊस बरसला. यानंतर पावसाने उघडीप दिली. यानंतर पेरणीच्या कामाला चांगलाच वेग आला. ७२ टक्के पेरण्या आटोपल्या. मात्र पेरणी केलेले सोयाबीनचे सर्टिफाईड बियाणे उगवलेच नाही. मात्र मोजक्याच शेतकऱ्यांनी याची तक्रार केली आहे.
सदोष बियाणे असल्याने उगविलेच नाही. दमदार पाऊस होऊनही केवळ बियाण्यामुळे शेतकºयांवर दुबार पेरणीचे संकट ओढावले आहे. काही कंपन्याच्या सर्टीफाईड बियाण्यात कचरा, खडे, गोटे, आणि कीड लागले दाणे आढळून आले. राज्य बियाणे गुणवत्ता नियंत्रण विभागाने निकृष्ट बियाण्याला मान्यता दिली कशी हा प्रश्न उपस्थित केला जात आहे. उगवण शक्ती नसलेले बियाणे कंपन्यानी शेतकऱ्यांच्या माथी मारले. पेरणी झाल्यावर लगेच पाऊस बरसल्याने बियाणे कंपन्यांचा बदमाशपणा उघड झाला आहे.
आता शेतकऱ्यांच्या तक्रारी वाढल्यानंतर कृषी विभागाने पेरणी झालेल्या शेतातील बियाण्याचे पंचनामे सुरू केले आहे. याशिवाय जिल्हयात प्राप्त झालेल्या बियाणे कंपन्याचे नमुने प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहे. त्याचा अहवाल अद्यापही अप्राप्त आहे. हा अहवाल मिळाल्यानंतरच कृषी विभाग सदोष बियाणे विकणाऱ्या कंपन्या विरोधात कारवाईचे पाऊल उचलणार आहे. मात्र या शासकीय सोपस्कारातून शेतकऱ्यांच्या हाती काहीच येणार नाही. असा पूर्वानुभव असल्याचे शेतकऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. कंपन्या न्यायालयीन प्रक्रियेत दिवस काढतात. शेतकऱ्यांला आर्थिक फटका सोसून दुबार पेरणीची तयारी करावीच लागते.

महाबीज देणार दुबार पेरणीला बियाणे
१२ कंपन्याचे बियाणे उगवले नाही अशा आहेत. यामध्ये महाबिज कंपनीने त्यांच्या बियण्यासंदर्भातील तक्रारीची दखल घेतली आहे. अशा तक्रारीत शेतकºयांना सोयाबीनची पर्यायी बियाणे तत्काळ देण्याचे आदशे महाबीजचे अपर सचिव उमेश चांदिवडे यांनी काढले आहेत.

Web Title: Rain of complaints against seeds

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.