राजूर पिटस्च्या पाण्यासाठी साकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2018 11:25 PM2018-01-30T23:25:10+5:302018-01-30T23:25:57+5:30

वणी शहरात निर्माण झालेल्या पाणी टंचाईवर मात करण्यासाठी राजूर पिटस्चे (खाणीतून निघणारे पाणी) पाणी निर्गुडा नदीत सोडावे, या मागणीसाठी काही नगरसेवकांनी एकत्र येऊन आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांना साकडे घातले आहे.

Rajur Pitts' water for the water | राजूर पिटस्च्या पाण्यासाठी साकडे

राजूर पिटस्च्या पाण्यासाठी साकडे

Next
ठळक मुद्दे नगरसेवकांचे आमदारांना निवेदन : पाणी प्रश्नावर नगरपालिकेत दोन मतप्रवाह

लोकमत न्यूज नेटवर्क
वणी : वणी शहरात निर्माण झालेल्या पाणी टंचाईवर मात करण्यासाठी राजूर पिटस्चे (खाणीतून निघणारे पाणी) पाणी निर्गुडा नदीत सोडावे, या मागणीसाठी काही नगरसेवकांनी एकत्र येऊन आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांना साकडे घातले आहे. यासंदर्भात सोमवारी या नगरसेवकांनी आमदार बोदकुरवार यांना निवेदन दिले.
नगरसेवकांची मागणी लक्षात घेऊन आमदारांनी यासंदर्भात लगेच वेकोलिच्या महाप्रबंधकांशी संपर्क करून राजूर पिटस्चे पाणी निर्गुडा नदीत सोडणे शक्य आहे का, याबाबत विचारणा केली. त्यावर महाप्रबंधकांनी २४ तास राजूर पिटस्चे पाणी देण्याची तयारी दर्शविली. मात्र यासंदर्भात वेकोलिला लेखी पत्र देण्याबाबत सूचविले. आता यावर आमदार काय भूमिका घेतात, याकडे नगरसेवकांचे लक्ष लागले आहे. वणी नगर पालिकेच्यावतीने रांगणा येथील वर्धा नदीच्या डोहावरून पाणी पुरवठा योजना सुरू करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. मात्र नव्या पाणी पुरवठा योजनेच्या पाण्याचा पुरवठा सुरू होईस्तोवर राजूर पिटस्चे पाणी निर्गुडा नदीत सोडावे, अशी १४ नगरसेवकांची मागणी आहे. सध्या वणी शहरात पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाल्याने नगरसेवकांना नागरिकांच्या रोषाचा सामना करावा लागत असल्याचे आमदारांना दिलेल्या निवेदनात नगरसेवकांनी म्हटले आहे. दरम्यान, पाणी प्रश्नावरून नगरपालिकेत दोन मतप्रवाह तयार झाले आहेत. नगराध्यक्ष व काही नगरसेवकांच्या मते राजूर पिटस्चे पाणी पिण्यायोग्य नाही. सदर पाण्यात क्षार व आयर्न मोठ्या प्रमाणात असल्याने ते नागरिकांच्या आरोग्यासाठी घातक आहे, तर काही जाणकारांच्या मते हे पाणी पिण्यायोग्य आहे. त्यात क्षार आणि अन्य घटक असतील, परंतु आरोग्याला बाधा होईल, ईतक्या मोठ्या प्रमाणात नसल्याचे या जाणकारांचे म्हणणे आहे. विशेष म्हणजे सन २००४ मध्ये वणी शहरात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली होती, त्यावेळी राजूर पिटस्चे पाणी निर्गुडा नदीत सोडण्यात आले होते. जवळपास एक महिना या पाण्याचा वापर वणीकरांनी केला होता.
पाणी पुरवठा योजनेसाठी १५ कोटींचा निधी मंजूर
वर्धा नदीच्या रांगणा डोहावरून वणी पाणी आणण्यासाठी वणी नगरपालिकेने नळयोजना प्रस्तावित केली आहे. या अनुषंगाने आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी निधीसाठी वारंवार पत्र व्यवहार केला. तसेच हिवाळी अधिवेशनात पुरवणी मागण्यांद्वारे त्यांनी निधीची मागणी केली. सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला अखेर यश आले. शासनाने १५ कोटी रुपयांचा निधी मंजूर केल्याचे पत्र वित्त व नियोजन, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आ.संजीवरेड्डी बोदकुरवार यांना पाठविले आहे.
योजनेचा प्रस्ताव रवाना
वर्धा नदीवरून नळयोजना घेण्याबाबत पाठविण्यात आलेल्या प्रस्तावात काही त्रुटी असल्याने तो प्रस्ताव परत नगरपालिकेकडे आला होता. सोमवारी या प्रस्तावातील त्रुटी दूर करून मंगळवारी सदर प्रस्ताव पुन्हा जिल्हाधिकाºयांकडे पाठविण्यात आला आहे.
 

Web Title: Rajur Pitts' water for the water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.