आज रक्षाबंधन :
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2017 12:34 AM2017-08-07T00:34:24+5:302017-08-07T00:35:54+5:30
Next
एका आईच्या पोटी जन्मलेली भावंडं जगण्याच्या रहाटगाडग्यात दूर-दूर निघून जातात. नुसतेच फोन येतात.. भेटी होतच नाही. कधी कधी तर फोनही लागत नाही. पण रक्षाबंधन आले की मनाला आस लागते. कामं सोडून, सुट्ट्या टाकून बहीण-भाऊ एकमेकांकडे धाव घेतात. जाताना एक धागा नेतात... भौतिक अंतरातही मानसिक जवळीक बांधून ठेवण्यासाठी... त्यालाच राखी म्हणतात!