यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव पंचायत समितीला ‘आयएसओ’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2017 11:23 AM2017-11-22T11:23:03+5:302017-11-22T11:26:54+5:30
यवतमाळ जिल्ह्यातील राळेगणला हागणदरीमुक्त गावाचा मान मिळाला असून त्याकरिता त्याला आयएसओ हे मानांकन प्रदान करण्यात आले आहे.
आॅनलाईन लोकमत
यवतमाळ: हागणदारीमुक्तीचे उद्दिष्ट राळेगाव पंचायत समितीने पूर्ण केले आहे, हे अभिमानाची बाब आहे. यशवंत पंचायत राज अभियानात राळेगाव दुसऱ्या क्रमांकावर आहे. आयएसओ मानांकन प्राप्त करणारी राळेगाव ही पहिली पंचायत समिती आहे. प्रायोगिक तत्वावर या पंचायत समितीने केलेल्या गोष्टी जिल्ह्यातील इतर पंचायत समित्यांसाठी मार्गदर्शक आहे. या बाभूळगाव, राळेगाव आणि कळंब हे तिनही तालुके हागणदारीमुक्त होणारे हे पहिले विधानसभा क्षेत्र ठरले आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री मदन येरावार यांनी केले.
राळेगाव पंचायत समिती येथे उत्सव हागणदारीमुक्ती याबाबत आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा माधुरी आडे, आमदार डॉ. अशोक उईके, राळेगाव पंचायत समितीचे सभापती प्रवीण कोकाटे, उपसभापती नीलेश रोठे, जिल्हा परिषद सदस्य चित्तरंजन कोल्हे, उषा भोयर, प्रिती काकडे, पंचायत समिती सदस्या शिला सलामे, स्नेहा येणोरकर, प्रशांत तायडे, ज्योती खैरकार, राळेगावचे नगराध्यक्ष बबन भोंगारे, मुख्य कार्यकारी अधिकारी दीपककुमार सिंगला, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भुयार, उपविभागीय अधिकारी संदीपकुमार अपार, गटविकास अधिकारी विनोद खेडकर आदी उपस्थित होते.
पंचायत समितीने संपूर्ण तालुका हागणदारीमुक्त करून राज्यात पंचायत समितीला आयएसओ दर्जा प्राप्त करून दिला आहे. ही अत्यंत गौरवाची बाब आहे. जिल्ह्यातील इतर तालुक्यांनीसुद्धा राळेगाव पंचायत समितीचा आदर्श घ्यावा, असे प्रतिपादन पालकमंत्री मदन येरावार यांनी केले.
राळेगाव येथे उत्सव हागणदारीमुक्त कार्यक्रमात अधिकारी, कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.