राळेगावात डॉक्टर, वकील, इंजिनिअर रिंगणात

By admin | Published: February 13, 2017 01:21 AM2017-02-13T01:21:00+5:302017-02-13T01:21:00+5:30

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत डॉक्टर, वकील, इंजिनिअर, कंत्राटदार, शिक्षक, सहकार महर्षी, शिक्षणसंस्था संचालक आदींनी

Ralegaon doctor, lawyer, engineer in the ring | राळेगावात डॉक्टर, वकील, इंजिनिअर रिंगणात

राळेगावात डॉक्टर, वकील, इंजिनिअर रिंगणात

Next

के.एस. वर्मा  राळेगाव
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत डॉक्टर, वकील, इंजिनिअर, कंत्राटदार, शिक्षक, सहकार महर्षी, शिक्षणसंस्था संचालक आदींनी विविध पक्षातर्फे उमेदवारी दाखल केली आहे.
डॉ. शशीकला भालचंद्र जवादे या एमडी, डीजीओ, स्त्रीरोग विशेषज्ञ आहेत. सर्वाधिक सुशिक्षित व वयस्कर (७० वर्षे) उमेदवार वडकी जिल्हा परिषद गटातून काँग्रेसतर्फे लढत देत आहेत. त्यांचे पती डॉ. भालचंद्र जवादे (दिवंगत) यांनी सन ९२ ते ९७ या काळात वडकी गटातून प्रतिनिधित्व केले होते. नागपूर येथे सध्या वैद्यकीय व्यवसाय सांभाळत असलेल्या डॉ. शशिकला या त्यांच्या पतीचा सामाजिक व राजकीय वसा पुढे चालविण्याकरिता निवडणूक रिंगणात आले असल्याचे सांगतात.
जिल्हा परिषद सदस्य अ‍ॅड़ सीमा तेलंगे यांनी पाच वर्षे वरध जिल्हा परिषद गटातून काँग्रेसकडून प्रतिनिधीत्व केले, आता त्या जळका गटातून भाग्य अजमावत आहे. इंजिनिअर व कंत्राटदार अरविंद वाढोणकर वरध जिल्हा परिषद गटात काँग्रेसकडून उभे आहेत. येथेच वसंत सहकारी जिनिंग प्रेसिंगचे दोन वेळा अध्यक्षपद भूषविणारे सहकार महर्षी चित्तरंजन कोल्हे भाजपातर्फे लढत देत आहे. किन्ही जवादे येथील साई पॉलिटेक्नीकचे संचालक संजय काकडे यांच्या पत्नी प्रीती काकडे भाजपतर्फे वडकी जिल्हा परिषदेतून निवडणूक रिंगणात आहे.
राळेगाव येथील प्रथितयश डॉक्टर व इंजापूरचे मुळ निवासी डॉ. बाबाराव भोयर यांनी गत ५० वर्षात परिसरात दिवसरात्र ग्रामस्थांना सतत वैद्यकीय सेवा दिली. त्यांच्या या संपर्काच्या भरवशावर त्यांच्या सौभाग्यवती उषा भोयर यांनी जळका जिल्हा परिषद गटातून भाजपातर्फे उमेदवारी दाखल केली आहे. धानोरा गणातून भाजपातर्फे उमेदवारी दाखल करणाऱ्या स्रेहा विजय येणोरकर या २४ वर्षीय गृहिणी तालुक्यात सर्वाधिक कमी वयाच्या आहेत. विविध क्षेत्रात कार्यरत उमेदवारांनी निवडणूक रिंगणात उडी घेतली आहे. प्रत्येक उमेदवारांकडून विजयाचा दावा केला जात आहे.

Web Title: Ralegaon doctor, lawyer, engineer in the ring

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.