लोकसंख्या दिनानिमित्त रॅली

By admin | Published: July 12, 2017 01:00 AM2017-07-12T01:00:21+5:302017-07-12T01:00:21+5:30

जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त येथील पोस्टल ग्राऊंडवरून जनजागरण रॅली काढण्यात आली.

Rally on population day | लोकसंख्या दिनानिमित्त रॅली

लोकसंख्या दिनानिमित्त रॅली

Next

शाळा-महाविद्यालयांचा सहभाग : छोटे कुटुंब ठेवण्याबाबत जागरुकता
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त येथील पोस्टल ग्राऊंडवरून जनजागरण रॅली काढण्यात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा माधुरी आडे होत्या.
प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हाधिकारी सचिंद्र प्रतापसिंह, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपककुमार सिंगला, पोलीस अधीक्षक एम. राजकुमार, नगर पालिकेच्या अध्यक्ष कांचन चौधरी, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष, आरोग्य सभापती नंदिणी दरणे, समाजकल्याण सभापती प्रज्ञा भूमकाळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. टी. जी. धोटे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. के. झेड. राठोड उपस्थित होते.
संचालन प्रशांत पाटील यांनी तर प्रास्ताविक जिल्हा आरोग्य अधिकारी के.झेड.राठोड यांनी केले. मान्यवरांना हस्ते हिरवी झेंडी दाखवून जनजागृती रॅलीला सुरुवात करण्यात आली. सदर रॅलीत महात्मा फुले समाजकार्य महाविद्यालय, शिवाजी विद्यालय कनिष्ठ महाविद्यालय, अभ्यंकर कन्या कनिष्ठ महाविद्यालय, महिला विद्यालय, संजिवनी नर्सिंग स्कूल, शासकीय नर्सिंग कॉलेज, समाजकार्य महाविद्यालयाचे विद्यार्थी यांच्यासह इंडियन मेडीकल असोसिएशन यवतमाळ शाखा, रोटरी क्लब, लायन्स क्लब तसेच इतर सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी सहभागी झाले.
पोस्टल ग्राऊंडवरून निघालेली ही रॅली शहरातील मेन रोड, बस स्टँड चौक, गार्डन रोड आणि परत पोस्टल ग्राऊंड येथे आली. रॅलीचा समारोप पोस्टल ग्राऊंड येथे करण्यात आला.

Web Title: Rally on population day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.