रामनामाच्या गजरात रामभक्तांची दुचाकीने प्रभातफेरी, सर्वत्र मंगलमय वातावरण

By सुरेंद्र राऊत | Published: March 30, 2023 02:27 PM2023-03-30T14:27:38+5:302023-03-30T14:30:59+5:30

जयहिंद चौक येथील श्रीराम मंदिरात प्रभातफेरीचे समापन

Rama Bhaktas bike ride at dawn amid by chanting of Rama Nama on the occasion of ramnavmi | रामनामाच्या गजरात रामभक्तांची दुचाकीने प्रभातफेरी, सर्वत्र मंगलमय वातावरण

रामनामाच्या गजरात रामभक्तांची दुचाकीने प्रभातफेरी, सर्वत्र मंगलमय वातावरण

googlenewsNext

यवतमाळ : रामनवमी निमित्त यवतमाळ शहरातून रामभक्तांनी दुचाकीने भव्य प्रभातफेरी काढली. रामनामाचा गजर करीत पारंपारिक वेशभूषेतील दुर्गवाहिणीच्या महिला कार्यकर्त्या आणि विश्व हिंदू परिषद व बजरंग दलासह रामभक्त यवतमाळकर नागरिक या प्रभातफेरीत सहभागी झाले. 

दत्त चौकात प्रभू श्रीरामाची आरती करून शेकडो कार्यकर्ते हाती भगवे ध्वज, भगवे फेटे परिधान करून जय श्रीराम असे नारे देत निघाले, या दुचाकी रॅलीने शहराच्या सर्व प्रमुख मार्गावरून मार्गक्रमण केले. ठिकठिकाणी यवतमाळकरांनी या प्रभातफेरीचे रांगोळी काढून तसेच थंड पेय व नाश्ता देऊन स्वागत केले. जयहिंद चौक येथील श्रीराम मंदिरात प्रभातफेरीचे समापन झाले. 

दरम्यान जयहिंद चौक व गणपती मंदिर चौकात ५१ फूट उंच भगव्या ध्वजाची स्थापना करण्यात आली. या प्रभातफेरीत विश्व हिंदू परिषदेचे विभागमंत्री राम लोखंडे, गौरव सूचक, मनोज औदार्य, गोविंद मोर, मनीष बिसेन, सचिन तुरकर, राहुल ढोके, अमोल ढोणे, प्रदीप खराटे, अभिजित डोंगरे, भुपेंद्र परिहार, अंकुश बगमारे, देवा राऊत, लाला शहा, विवेक सज्जनवार, उज्वल सैनी, योगीन तिवारी, श्याम माकोडे, महेंद्र पाखरे, राजू शर्मा, अजय गटलेवार, राम नथवाणी, शुभम मोरे, प्रीतम शहाडे, शुभम शर्मा, संजय वानखेडे, संजय दंडे,  अश्विन बोपचे, सूरज ठाकूर आदी सहभागी झाले होते.

Web Title: Rama Bhaktas bike ride at dawn amid by chanting of Rama Nama on the occasion of ramnavmi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.