दिग्रस येथे रमजान ईद उत्साहात
By admin | Published: June 29, 2017 12:14 AM2017-06-29T00:14:23+5:302017-06-29T00:14:59+5:30
रमजान ईद शहरात अत्यंत उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी गरीब, वंचित, शोषित, पीडित, वृद्ध, अनाथ, अपंग आदींना
लोकमत न्यूज नेटवर्क
दिग्रस : रमजान ईद शहरात अत्यंत उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी गरीब, वंचित, शोषित, पीडित, वृद्ध, अनाथ, अपंग आदींना मायेची ऊब देणे, हीच खरी ईद आहे, असे मत काजी मौलाना अबुल जफर यांनी व्यक्त केले. जामा मशिद येथे ईद-उल-फित्रच्या प्रवचनानंतर सोमवारी सकाळी १०.३० वाजता त्यांनी विशाल जनसमुदायाला संबांधित केले.
यावेळी उपस्थितांनी देशाचे ऐक्य आणि अखंडतेसाठी सामूहिक प्रार्थना केली. ईद उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी माजी राज्यमंत्री संजय देशमुख, भाजपचे जिल्हा सरचिटणीस महादेव सुपारे, माजी नगराध्यक्ष रवींद्र अरगडे, सुधीर देशमुख, उपनगराध्यक्ष अजिंक्य मात्रे, सभापती के.टी. जाधव, सभापती बाळू जाधव, सभापती सैयद अकरम, नगरसेवक जावेद पहेलवान, केतन रत्नपारखी, डॉ.संदीप दुधे, शिवसेना तालुका प्रमुख राजकुमार वानखडे, संजय कुकडी, घंटीबाबा संस्थानचे कोषाध्यक्ष गोपाल शाह, बाबूसिंग जाधव, तोमरेश ठाकरे, अॅड.नरेश इंगोले, रमेश पवार, डॉ.प्रमोद इंगळे, तहसीलदार किशोर बागडे, पोलीस निरीक्षक शिवाजी बचाटे, उपनिरीक्षक गणेश मोरे, बालाजी बँकेचे अध्यक्ष राहुल शिंदे, यशवंत सुर्वे पाटील, किशोर कांबळे, राहुल देशपांडे, प्रदीप मेहता, अरविंद गादेवार, रामदास पद्मावार, हनुमान रामावत आदी उपस्थित होते.