कृषी विभागाच्या वतीने रानभाजी मेळावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2021 04:47 AM2021-08-13T04:47:55+5:302021-08-13T04:47:55+5:30
स्थानिक बाजार समितीच्या सभागृहात घेण्यात आलेल्या या मेळ्याव्यात ५० पेक्षा जास्त नागरिकांनी विविध रानभाज्यांचे स्टॉल लावले होते. मेळाव्याचे उद्घाटन ...
स्थानिक बाजार समितीच्या सभागृहात घेण्यात आलेल्या या मेळ्याव्यात ५० पेक्षा जास्त नागरिकांनी विविध रानभाज्यांचे स्टॉल लावले होते. मेळाव्याचे उद्घाटन पंचायत समिती सभापती शीतल पोटे यांच्या हस्ते झाले. प्रमुख पाहुणे म्हणून भाजप जिल्हा सचिव शंकर लालसरे, मंडळ कृषी अधिकारी ए. डी. कनाके आदी उपस्थित होते. उपविभागीय कृषी अधिकारी जे. आर. राठोड, तालुका कृषी अधिकारी सुनील निकाळजे यांच्या मार्गदर्शनात या मेळाव्याचे आयोजन तालुका कृषी विभागाने केले होते. यासाठी तंत्रज्ञान व्यवस्थापक पी. आर. पारसकर, प्रवीण कचाटे, ज्ञानेश्वर गाडगे, अक्षय सोनुले, रंजित सोयाम यांनी परिश्रम घेतले. यावेळी उत्कृष्ट रानभाज्या स्टॉल लावणाऱ्यांना बक्षीस व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. संचालन हरिदास पवार यांनी केले, तर आभार बी. आर. पारस्कर यांनी मानले.