उपाध्यक्षपदासाठी रस्सीखेच
By admin | Published: July 21, 2014 12:24 AM2014-07-21T00:24:06+5:302014-07-21T00:24:06+5:30
येथील नगरपरिषदेच्या उपाध्यक्ष पदासाठी आता प्रचंड रस्सीखेच सुरू झाली आहे. सहा उमेदवारांनी या पदासाठी अर्ज दाखल केले असून त्यात विरोधी गटातर्फे चक्क चौघांनी अर्ज भरले आहे.
वणी : येथील नगरपरिषदेच्या उपाध्यक्ष पदासाठी आता प्रचंड रस्सीखेच सुरू झाली आहे. सहा उमेदवारांनी या पदासाठी अर्ज दाखल केले असून त्यात विरोधी गटातर्फे चक्क चौघांनी अर्ज भरले आहे.
येथील नगरपरिषद सतत विविध कारणांनी चर्चेत असते. आता नगराध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाच्या निवडीमुळे पुन्हा ही नगरपरिषद चर्चेत आली आहे. यावेळी नगराध्यक्ष पद अनुसूचित जातीच्या महिला सदस्यासाठी आरक्षित असल्याने त्याबाबत फारशी उत्सुकता नाही. कारण या प्रवर्गातील दोनच महिला सदस्य आहेत. त्यात सत्ताधाऱ्यांकडे अपक्ष करुणा कांबळे, तर विरोधकांकडे मनसेच्या प्रिया लभाने यांचा समावेश आहे. अध्यक्ष पद आरक्षित असल्यामुळेच आता उपाध्यक्ष पदासाठी चुरस निर्माण झाली आहे.
नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीचा वाद विभागीय आयुक्तांच्या दरबारात पोहोचला आहे. लभाने यांचा अर्ज फेटाळण्यात आल्याने त्यांनी अपिल केले आहे. त्यामुळे शनिवारी येथील या दोनही पदांची निवडणूक होऊ शकली नाही. सोमवारी लभाने यांच्या अपिलावर निर्णय अपेक्षित आहे. त्यानंतरच या दोनही पदांच्या निवडीचा मार्ग सुकर होणार आहे. दरम्यान आता उपाध्यक्ष पदासाठी प्रचंड चुरस निर्माण झाली आहे. विरोधकांना त्यासाठी धडपड चालविली आहे. उपाध्यक्ष पदासाठी विरोधकांतर्फे मनसेचे गटनेते अभिजित सातोकर, राजेश डफ, अशोक बुरडकर आणि धनंजय त्रिंबके यांनी, तर सत्ताधाऱ्यांतर्फे कॉंग्रेसचे कैसर पटेल व अपक्ष धनराज भोंगळे यांनी अर्ज दाखल केले आहे. भोंगळे आणि पटेल या दोघांपैकी एक उमेदवारग अर्ज मागे ोणार आहे. त्यामुळे सत्ताधााऱ्यांतर्फे केवळ एकच अमेदवार रिंगणात राहणार आहे. मात्र चार विरोधी उमेदवारांपैकी नेकमे कोण अर्ज मागे घेतात, याबाबत अद्याप गुढ कायम आहे. (कार्यालय प्रतिनिधी)