राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जयंती सोहळा
By admin | Published: April 30, 2017 01:18 AM2017-04-30T01:18:02+5:302017-04-30T01:18:02+5:30
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या १०८ व्या जयंती सोहळ््याचे आयोजन येथील गुरूदेव सेवा मंडळ तालुका शाखेच्यावतीने ३० एप्रिल रोजी करण्यात आले आहे.
गुरूदेव सेवा मंडळ : पुसद येथे आज गुरूदेव भूषण पुरस्काराचे वितरण
पुसद : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या १०८ व्या जयंती सोहळ््याचे आयोजन येथील गुरूदेव सेवा मंडळ तालुका शाखेच्यावतीने ३० एप्रिल रोजी करण्यात आले आहे. यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांसह प्रतिष्ठेच्या श्री गुरूदेव भूषण पुरस्काराचेही वितरण करण्यात येणार आहे.
स्थानिक देशमुखनगरमधील साप्ताहिक प्रार्थनास्थळी सांय. ७ वाजता हा कार्यक्रम होत आहे. अध्यक्षस्थानी माजी मंत्री तथा आमदार मनोहरराव नाईक असतील. याप्रसंगी हभप भगवान हातमोडे महाराज हे ‘राष्ट्रसंतांचे मानवता व समाजोन्नतीचे विचार’ या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून विदर्भ शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष लक्ष्मणराव जाधव, वसंतराव नाईक स्मृतीप्रतिष्ठाचे अध्यक्ष दीपक आसेगांवकर, उपविभागीय पोलीस अधिकारी अजयकुमार बन्सल, मुख्याधिकारी डॉ. अजय कुरवाडे, लोकहित शिक्षण संस्थेचे अध्यक्ष महेश खडसे आदी उपस्थित राहणार आहेत.
राष्ट्रसंताच्या कार्याचा प्रचार व प्रसार करणारे ज्येष्ठ अनुयायी नंदकुमार पंडीत यांना यंदाचा दुसरा श्रीगुरूदेव भूषण पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे. याप्रसंगी सर्व धर्मीय सामुदायिक प्रार्थना, खंजीरी भजन, महाप्रसाद, साई भजनी
मंडळाचे भजन आदी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
यशस्वीतेसाठी मंडळाचे डॉ. संजय गुंबळे, प्रा. नंदकुमार खैरे, डॉ. अनिल भावसार, शरद देशपांडे, अॅड़ गजानन साखरे, माधव जाधव, अनिल अस्वार, मनोहर बनस्कर, बाबासाहेब वाघमारे, संभाजी बळी, यशवंत देशमुख, ज्ञानेश्वर इंगोले, गजानन जाधव, दशरथ सूर्यवंशी दिवाकर मोरे, पांडुरंग बुरकुले, नरेश ढाले, ज्ञानेश्वर ताकतोडे, अशोक लामणे, हिरा कान्हेड, अजय दुपारते, मोहन जाधव, प्रा. नरेश राठोड, नंदकुमार पंडीत, गजानन कवाने आदी परिश्रम घेत आहेत. (प्रतिनिधी)