पुसदमध्ये कोरोना चाचणीचे प्रमाण घटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2021 05:00 AM2021-07-01T05:00:00+5:302021-07-01T05:00:18+5:30

तालुक्यात ४५ ते ६० वयोगटातील एक हजार ५८६ पुरुषांनी, तर एक हजार ३९२ महिलांनी कोविशिल्डचा पहिला डोस घेतला. ६२९ पुरुष व ६३२ महिलांनी दुसरा डोस घेतला. ६० वर्षांपेक्षा जास्त वयोगटातील ९६८ पुरुष व एक हजार १९ महिलांनी पहिला डोस, तर ५६० पुरुष व ५१९ महिलांनी दुसरा डोस घेतला. जून महिन्यात १० हजार ३४५९ जणांनी पहिला, तर तीन इजार ६१६ जणांनी दुसरा डोस घेतला. दोन हजार ८४३ जणांनी कोव्हॅक्सिनचा पहिला, तर दोन हजार ७४२ जणांनी दुसरा डोस घेतला.

The rate of corona testing decreased in Pusad | पुसदमध्ये कोरोना चाचणीचे प्रमाण घटले

पुसदमध्ये कोरोना चाचणीचे प्रमाण घटले

Next
ठळक मुद्देग्रामीण भागात चाचणीची भीती : लसीकरणाकडे वाढला नागरिकांचा कल

लोकमत न्यूज नेटवर्क
पुसद : तालुक्‍यात काही दिवसांपासून कोरोना रुग्ण अचानक कमी झाले. ही अभिमानाची बाब असली, तरी तालुक्‍यात चाचण्यांचे प्रमाण घटले आहे. हातावर पोट असणाऱ्यांसह अनेकांनी चाचणीच केली नाही. मात्र, शहरासह ग्रामीण भागात लसीकरणासाठी उत्स्फूर्तता वाढली आहे. 
ग्रामीण भागात लसीकरण घटल्याच्या नोंदी आहेत. जनता मास्क न बांधता व सामाजिक अंतर न ठेवता बिनधास्त फिरत आहे. शहरातील बाजारपेठ ४ वाजताच बंद केली जात आहे. तरीही बाजारपेठेत सामाजिक अंतर दिसून येत नाही. व्यापारी नियम धाब्यावर बसवीत आहे. यामुळे कोरोनाचा संसर्ग पसरण्याची शक्यता आहे. तालुका आरोग्य कार्यालयाने टेस्टिंग करणे सध्या बंद केले. उपजिल्हा रुग्णालयातच टेस्टिंग होत आहे. त्यातही ग्रामीण भागासह शहरी भागात अनेक केंद्रे बंद करून प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रात चाचणी घेतली जात आहे. क्वारंटानईच्या भीतीने जनता चाचणी करून घेत नसल्यामुळे रुग्णांचे प्रमाण घटले. ज्यांना ताप, सर्दी, खोकला, अंगदुखी जाणवते, असे रुग्णदेखील चाचणी न करता मुक्‍तसंचार करीत आहेत. 

४५ ते ६० आणि व ६० वर्षांवरील लसीकरण
तालुक्यात ४५ ते ६० वयोगटातील एक हजार ५८६ पुरुषांनी, तर एक हजार ३९२ महिलांनी कोविशिल्डचा पहिला डोस घेतला. ६२९ पुरुष व ६३२ महिलांनी दुसरा डोस घेतला. ६० वर्षांपेक्षा जास्त वयोगटातील ९६८ पुरुष व एक हजार १९ महिलांनी पहिला डोस, तर ५६० पुरुष व ५१९ महिलांनी दुसरा डोस घेतला. जून महिन्यात १० हजार ३४५९ जणांनी पहिला, तर तीन इजार ६१६ जणांनी दुसरा डोस घेतला. दोन हजार ८४३ जणांनी कोव्हॅक्सिनचा पहिला, तर दोन हजार ७४२ जणांनी दुसरा डोस घेतला.

तालुक्यात जूनपर्यंत ६५ हजार जणांचे लसीकरण
तालुक्यात जवळपास ६५ हजार लोकांचे लसीकरण झाल्याचा दावा तालुका आरोग्य कार्यालयाकडून केला जातो. उपजिल्हा रुग्णालयात कोविशिल्डचा पहिला डोस घेण्यासाठी ६२६ पुरुष, तर ६३९ महिला हेल्थ केअर प्रोव्हायडर समोर आल्या. आजवर एक हजार २६५ जणांनी पहिला डोस घेतला. यात ३२९ पुरुष, ३४६ महिलांनी कोविशिल्डचा दुसरा डोस घेतला. तालुक्‍यातील एक हजार ९७ पुरुष, तर एक हजार ४३ महिला फ्रंटलाईन वर्करने कोविशिल्डचा पहिला, तर ३६३ पुरुषांनी व २३८ महिलांनी दुसरा डोस घेतला. 

 

Web Title: The rate of corona testing decreased in Pusad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.