राठोड बंधूंची भरारी : बोरगाव येथे ऑईल मिल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2020 06:00 AM2020-01-23T06:00:00+5:302020-01-23T06:00:11+5:30

या भावंडांनी लहानपणापासूनच जिद्द आणि मेहनत करण्याची क्षमता जोपासली. त्यांनी ठरवलं की, आपण नोकर म्हणून नाही तर मालक म्हणून जगायचं. मात्र घरची परिस्थिती बेताची असल्यामुळे दोघांनाही शिक्षण घेणे शक्य नव्हते. त्यामुळे विश्वजितने स्वत:चे शिक्षण बंद करून मोठ्या भावाच्या अर्थात रंजितच्या शिक्षणासाठी हातभार लावला. त्यासाठी दुसऱ्याच्या चहा टपरीवर, रसवंतीवर, स्टेशनरी दुकानात कामे केली.

Rathore Brothers Bharari: Oil Mill at Borgaon | राठोड बंधूंची भरारी : बोरगाव येथे ऑईल मिल

राठोड बंधूंची भरारी : बोरगाव येथे ऑईल मिल

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
आर्णी : माणसाच्या मनात जिद्द व परिश्रम घेण्याची उर्मी असली की, कोणतीही गोष्ट साध्य करता येते. याची प्रचिती तालुक्यातील बोरगाव येथील राठोड बंधूनी दिली अहे. रंजित आणि विश्वजित या भावंडांनी स्वत: बरोबरच गावातील ३00 जणांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे.
या भावंडांनी लहानपणापासूनच जिद्द आणि मेहनत करण्याची क्षमता जोपासली. त्यांनी ठरवलं की, आपण नोकर म्हणून नाही तर मालक म्हणून जगायचं. मात्र घरची परिस्थिती बेताची असल्यामुळे दोघांनाही शिक्षण घेणे शक्य नव्हते. त्यामुळे विश्वजितने स्वत:चे शिक्षण बंद करून मोठ्या भावाच्या अर्थात रंजितच्या शिक्षणासाठी हातभार लावला. त्यासाठी दुसऱ्याच्या चहा टपरीवर, रसवंतीवर, स्टेशनरी दुकानात कामे केली. या कामातून तुटपुंजी मिळकत होत असल्याने कुटुंबाचा गाडा हाकणे कठीण झाले होते. अखेर विश्वजितने आपल्या गावी बोरगाव येथे शेतात राबण्यास सुरूवात केली.
कापूस वेचणीपासून त्याने शेतातील कामास सुरूवात केली. नंतर गावात मिळेल ती कामे तो करू लागला. चार ते पाच वर्ष दुसºयाकडे शेतीची कामे केली. नंतर दुसऱ्यांची शेती भाडेतत्त्वावर करण्यास सुरूवात केली. त्यात कपाशीची पेरणी करून चांगले उत्पन्न घेतले. कापूस आर्णीत आणून विकला. सोबतच दुसºया शेतकºयांचा कापूसही विक्रीस आणू लागला. यातून त्याचे व्यापाºयांसोबत सलोख्याचे संबंध निर्माण झाले. मग विश्वजितने स्वत:च कापूस खरेदीचा व्यवसाय सुरू केला.
या दरम्यान, मोठा भाऊ रंजितचे शिक्षण पूर्ण करून तो पुण्याला नोकरीच्या शोधात गेला. तेथे माहेश्वरी मंडळात त्याल्या नोकरी मिळाली. त्या नोकरीच्या पगारात भागत नसल्यामुळे तो यवतमाळला परत आला. एका फायनान्स कंपनीत काम करू लागला. तेथे तीन-चार वर्षे काम केल्यानंतर रंजितने लहान भाऊ विश्वजित बरोबर काम करायचा निर्णय घेतला.
या भावंडांनी कापूस खरेदीचा व्यवसाय वाढवला. त्यातून शेतकºयांची मने जिंकली. नंतर बोरगाव येथेच जिनिंग टाकण्याचा निर्णय घेतला. मात्र जागा उपलब्ध नसल्याने स्वप्न साकार होईल की नाही, या काळजीत असताना त्यांना नानाजी लिंगावार, दीपक शामराव पाटील यांनी जागेचा प्रश्न सोडविला. तरुण राठोड बंधूंना त्यांनी उद्योजक बनण्यासाठी प्रेरणा दिली. त्या जागी जिनिंगची वास्तू उभी करून राठोड बंधूंनी गावातच कापूस खरेदी सुरु केली. जिनिंगसाठी लागणारी यंत्रे महागडी असल्याने त्यांनी प्रथम भंगारात विकलेल्या मशीन उपयोगात आणल्या.

अंगभूत क्षमतांची जाणीव
अनेक उद्योग उभारण्याची क्षमता आपल्या अंगी असल्याचे ओळखून राठोड बंधूंनी २०१८ मध्ये गावातच मानुदास आॅइल मिलची सुरुवात केली. या मिलमधून जवळपास ३00 तरुणांना रोजगार उपलब्ध करून दिला. एकेकाळी दुसºयाच्या चहा टपरीवर काम करणाºया राठोड बंधूंनी गावातच स्वत:चा उद्योग उभारून इतरांच्या रोजगाराचा प्रश्न मिटविला. सध्या हे भाऊ ३00 कुटुंबाचे पोषणकर्ते बनले आहे.

Web Title: Rathore Brothers Bharari: Oil Mill at Borgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.