रेशन ग्राहकाच्या खुनात दोघांना जन्मठेप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2017 10:11 PM2017-12-22T22:11:16+5:302017-12-22T22:11:54+5:30

रास्त भाव धान्य दुकानदाराने धान्य घेण्यासाठी आलेल्या ग्राहकाशीच वाद घातला. ग्र्र्राहक पोलीस ठाण्यात तक्रार देऊन गावाकडे परत येत असताना त्याचा रस्त्यातच अडवून खून केल्याप्रकरणी न्यायालयाने दोघांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावली.

Ration has given life to both of the customers | रेशन ग्राहकाच्या खुनात दोघांना जन्मठेप

रेशन ग्राहकाच्या खुनात दोघांना जन्मठेप

Next
ठळक मुद्देमाळम्हसोलाची घटना : स्वस्त धान्य दुकानदाराचा समावेश, अर्जुना घाटातील खून

यवतमाळ : रास्त भाव धान्य दुकानदाराने धान्य घेण्यासाठी आलेल्या ग्राहकाशीच वाद घातला. ग्र्र्राहक पोलीस ठाण्यात तक्रार देऊन गावाकडे परत येत असताना त्याचा रस्त्यातच अडवून खून केल्याप्रकरणी न्यायालयाने दोघांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावली.
सचिन सुत्रावे व प्रवीण पोटे रा. माळम्हसोला, अशी शिक्षा झालेल्या आरोपींची नावे आहे. माळम्हसोला येथील अजित चव्हाण हा २३ आॅगस्ट २०१५ रोजी गावातील रास्त भाव धान्य दुकानात गेला होता. तेथे त्याचा दुकानदार राजेश चव्हाण याचेशी वाद झाला. या घटनेची तक्रार करण्यासाठी अजित चव्हाण दुचाकीने यवतमाळ ग्रामीण पोलीस ठाण्यात आला. तेथून गावाकडे परत जाताना अजितला अर्जुना घाटात अडवून त्याच्यावर दोघांनी हल्ला केला. यात अजितचा जागीच मृत्यू झाला. यावेळी अजितची पत्नी घटनास्थळावर उपस्थित होती.
या घटनेची अजितच्या पत्नीने केट्रोल डिलर राजेश चव्हाण, सचिन सुत्रावे, प्रवीण पोटे व विधिसंघर्षग्रस्त बालकाविरोधात ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दिली. सहायक पोलीस निरीक्षक समाधान धंदरे यांनी या गुन्ह्याचा तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले.
या खटल्यात प्रमुख सत्र न्यायाधीश संदीपकुमार मोरे यांनी एकूण १३ साक्षीदार तपासले. त्यापैकी मृतकाची पत्नी व डॉक्टरांची साक्ष ग्राह्य धरत प्रवीण पोटे व सचिन सुत्रावे या दोघांना जन्मठेप व तीन हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. सरकारी पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील निती दवे व सहायक सरकारी वकील मंगेश गंगलवार यांनी बाजू मांडली.

 

Web Title: Ration has given life to both of the customers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Crimeगुन्हा