पांढरकवडा वनविभागातील वनकर्मचाऱ्यांचा सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2021 04:48 AM2021-08-20T04:48:26+5:302021-08-20T04:48:26+5:30
टिपेश्वर अभयारण्य लगतच्या गावांमध्ये वाघ, वाघिणींचा वाढत असलेल्या मुक्तसंचारामुळे मानव आणि वन्यजीव यांच्यात संघर्ष निर्माण झाला होता. अंधारवाडी शेतशिवारामध्ये ...
टिपेश्वर अभयारण्य लगतच्या गावांमध्ये वाघ, वाघिणींचा वाढत असलेल्या मुक्तसंचारामुळे मानव आणि वन्यजीव यांच्यात संघर्ष निर्माण झाला होता. अंधारवाडी शेतशिवारामध्ये धुमाकूळ घातलेल्या वाघिणीला जेरबंद करण्यासाठी वनविभागातील संपूर्ण यंत्रणा कामी लागली होती. वाघिणीच्या बारीकसारीक हालचालींवर लक्ष ठेवून तिला पकडण्यासाठी वनविभागातील क्षेत्रीय कर्मचाऱ्यांचा मोठा सहभाग होता. मानव-व्याघ्र संघर्ष व्यवस्थापन यामध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या वनविभागातील वनपाल विजेंद्र शिवप्रसाद दुधे, वनरक्षक दीपाली वासुदेव बनसोड, सचिन मारोती येडमे, सुदाम किसन आवारे, अर्चना देवराव कुडमेथे, किसन नामदेव पंडित, विनोद राजाभाऊ महाजन, अभिमान चंपत करपते, लक्ष्मण शंकर आडे अशा नऊ क्षेत्रीय कर्मचाऱ्यांना उपवनसंरक्षक (प्रादे) किरण जगताप यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी उपवनसंरक्षक (वन्यजीव) सुभाष पुराणिक, सहायक वनसंरक्षक संदीप चव्हाण, वनपरिक्षेत्र अधिकारी संगीता कोकणे आदी अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.