नांझा आरोग्य केंद्राचे अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कारवाईची शिफारस
By Admin | Published: February 23, 2015 12:18 AM2015-02-23T00:18:21+5:302015-02-23T00:18:21+5:30
तालुक्याच्या नांझा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला आमदार डॉ.अशोक उईके यांनी दिलेल्या भेटीत चक्क कुलूप आढळून आले.
कळंब : तालुक्याच्या नांझा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला आमदार डॉ.अशोक उईके यांनी दिलेल्या भेटीत चक्क कुलूप आढळून आले. याप्रकरणी वरिष्ठांच्या आदेशावरून चौकशी समितीने दोन वैद्यकीय अधिकाऱ्यांसह इतर कर्मचाऱ्यांवर कारवाईची शिफारस केली आहे.
तालुका आरोग्य अधिकारी डॉ.अविनाश देशमुख यांच्याकडे या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीची जबाबदारी होती. त्यांना बहुतांश कर्मचारी दोषी आढळून आले. याचा अहवाल त्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मल्लीनाथ कलशेट्टी आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.कुंदन राठोड यांच्याकडे तातडीने पाठविला आहे. या आरोग्य केंद्राचे डॉ.दुधे आणि डॉ.अचिंतलवार हे वरिष्ठांच्या आदेशाचे पालन करीत नाही. अधिनस्त कर्मचाऱ्यांवर प्रशासकीय नियंत्रण नाही. आवश्यक रेकॉर्ड अद्यावत ठेवण्यात आलेले नाही. त्यांच्यावर महाराष्ट्र नागरी सेवा नियम १९७९ चे अधीन राहून कारवाईची शिफारस करण्यात आली आहे. तसेच आरोग्य सहायक एस.आर. ठाकरे, एस.बी. मोहनापुरे एलएचव्ही ए.एम. गुल्हाने, औषध निर्माण अधिकारी व्ही.एन. कोटेचा यांच्यावरही मुख्यालयी न राहणे, रेकॉर्ड अद्यावत न ठेवणे आदी कारणांवरन कारवाईची शिफारस करण्यात आली आहे. (तालुका प्रतिनिधी)