यवतमाळ जिल्ह्यात ४५ पॉझिटिव्हसह आयसोलेशन वॉर्डात ५९ जण भरती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2020 06:57 PM2020-05-14T18:57:36+5:302020-05-14T18:57:58+5:30
वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्डात ४५ अॅक्टीव्ह पॉझेटिव्ह रुग्णांसह एकूण ५९ जण भरती आहेत. यात १४ प्रिझमटिव्ह केसेस असल्याचे वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रशासनाने कळविले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्डात ४५ अॅक्टीव्ह पॉझेटिव्ह रुग्णांसह एकूण ५९ जण भरती आहेत. यात १४ प्रिझमटिव्ह केसेस असल्याचे वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रशासनाने कळविले आहे.
जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयामार्फत धानोरा (ता. उमरखेड) येथील एकूण ६२ जणांचे नमुने तपासणीकरीता पाठविण्यात आले होते. यापैकी ४४ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहे. आज वैद्यकीय महाविद्यालयाने तपासणीकरीता १८ नमुने पाठविले. सुरवातीपासून आतापर्यंत एकूण १६४८ नमुने तपासणीकरीता पाठविण्यात आले आहे. यापैकी १५८२ प्राप्त तर ६६ अप्राप्त आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण १५८२ रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. संस्थात्मक विलगीकरणात २२ जण तर गृह विलगीकरणात एकूण १३२६ जण आहेत.
जिल्ह्यात काही दिवसांपासून कोरोनाबाधित रुग्णांचा वेग मंदावला असून बरे होण्याचे प्रमाण वाढले आहे. ही नक्कीच दिलासादायक बाब आहे. तरीसुध्दा नागरिकांनी स्वत:च्या आरोग्याच्या दृष्टीने घरातच रहावे. विनाकारण बाहेर पडू नये. अत्यावश्यक कारणास्तव बाहेर पडल्यास मास्कचा वापर करावा. सुरक्षित अंतराचे काटेकारपणे पालन करावे, असे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.