मूर्तीकारांना ‘एमआयडीसी’तील लाल माती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2018 10:02 PM2018-07-07T22:02:29+5:302018-07-07T22:03:35+5:30

जिल्ह्यातील मूर्तिकारांचा विविध सण, उत्सवाच्या काळात लाल मातीसाठी चालणारा संघर्ष महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांच्या प्रयत्नामुळे कायमचा संपुष्टात आला.

Red soil of idol idols 'MIDC' | मूर्तीकारांना ‘एमआयडीसी’तील लाल माती

मूर्तीकारांना ‘एमआयडीसी’तील लाल माती

Next
ठळक मुद्देआठ एकर जागा : कुंभार समाज संघटनेतर्फे संजय राठोड यांचा सत्कार, अनेक वर्षांच्या प्रयत्नांना मिळाले यश

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : जिल्ह्यातील मूर्तिकारांचा विविध सण, उत्सवाच्या काळात लाल मातीसाठी चालणारा संघर्ष महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांच्या प्रयत्नामुळे कायमचा संपुष्टात आला. एमआयडीसी क्षेत्रातील दोन हेक्टर ७५ आर हेक्टर, अंदाजे आठ एकर लाल मातीची जमीन आता महसूल विभागाने मूर्तिकारांना माती उत्खनन करण्यासाठी खुली केली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी तसे आदेश दिल्याने गणेशोत्सव आणि दुर्गाेत्सव काळात ऐरणीवर येणारा मूर्तिकार, महसूल विभाग आणि औद्योगिक विकास महामंडळाचा वाद आता मिटणार आहे.
मूर्तिकारांना लाल माती देण्यासाठी महसूल विभागाची ‘ई’ क्लास जमीन उपलब्ध नसल्याने ना. राठोड यांनी तहसीलदार व एमआयडीसीच्या अधिकाºयांना स्थळ पाहणी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार तहसीलदार सचिन शेजाळ, एमआयडीसीचे अभियंता कुळकर्णी, अमरावती येथून आलेले सर्वेअर यांनी एमआयडीसी क्षेत्राने वेढलेला पण लाल माती मुबलक असलेल्या शेत सर्व्हे नंबर ११९ चा शोध घेतला. टेकडीसदृश असल्याने ही जमीन कोणाची आहे, याचा शोध घेण्यासाठी जुने रेकॉर्ड तपासले. तेव्हा शासनाच्याच ताब्यात असलेल्या या जमिनीवर पूर्वी फायरिंग रेंज असल्याचे रेकॉर्डवर आढळले. मात्र एमआयडीसीची व्याप्ती वाढल्याने नंतर हे फायरिंग रेंज इतरत्र हलविण्यात आले. दोन हेक्टर ७५ आर म्हणजे अंदाजे आठ एकर क्षेत्र असलेल्या या जमिनीवर मूर्तिकारांना हवी असलेली लाल माती मोठ्या प्रमाणात उपलब्ध असल्याची खात्री या अधिकाºयांनी करून प्रस्ताव जिल्हाधिकाºयांकडे पाठविला. या प्रस्तावास मंजुरी देऊन एमआयडीसी क्षेत्रातील सर्र्वे नंबर ११९ ही जमीन मूर्तिकारांसाठी खुली केली.
ना. संजय राठोड यांनी लक्ष घातल्याने मूर्तिकारांच्या उपजीविकेचा प्रश्न कायमचा मिटला अशी कृतज्ञता व्यक्त करीत विदर्भ कुंभार समाजाचे अध्यक्ष के. एन. मोरे यांच्यासह जिल्ह्यातील मूर्तिकारांनी शनिवारी ना. संजय राठोड यांची भेट घेऊन त्यांचा सत्कार केला. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख पराग पिंगळे, मूर्तीकार स्नेहल बंडू वनकर, सुरेंद्र निमकर, अरविंद वनकर, राहुल तायडे, लखन प्रजापती, गणेश खंडरे, गौरव तायडे, धनंजय तायडे, दिलीपपाल कुंभार, विक्की बेहरे, अतिश लव्हेकर, अमोल कुचे, उमेश पराळे, गणेश दुधे, विक्की ताजने आदी उपस्थित होते.

Web Title: Red soil of idol idols 'MIDC'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.